IPO Listing : आज Raymond Reality, Kalpataru, Ellenbarrie Industrial Gases बाजारात सूचीबद्ध झाली 'या' प्रिमियम दराने शेअरची विक्री सुरू

  32

प्रतिनिधी: एलेनबेरी वगळता रेमंड व कल्पतरूच्या शेअर्सने आज बाजारात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आज एलेनबेरी, रेमंड रिअल्टी, कल्पतरू हे शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. सकाळी रेमंडचा शेअर ८% व दुपारपर्यंत ६% उसळला होता.सकाळी बाजार उघडल्यावरच  रेमंड शेअर इशू प्राईज १०३९ रूपयांच्या तुलनेत ३% अधिक दराने घसरत ७५० रूपयांच्या आसपास खरेदी केला जात होता. मात्र काही वेळानंतर रेमंड रिअल्टीचा शेअर ५% प्रिमियम दराने विकला जात १,०५० रुपयांवर पोहोचला होता. १ मे २०२५ रोजी रेमंड रिअल्टीचे समभाग त्याच्या मूळ कंपनी रेमंड लिमिटेड मधून १:१ गुणोत्तर प्रमाणात वेगळे करण्यात आले होते. रेकॉर्ड डेटनुसार प्रत्येक रेमंड भागभांडवलधारकांना त्यांच्या मालकीच्या रेमंडच्या प्रत्येक शेअरसाठी रेमंड रिअल्टीचा एक शेअर मिळणार आहे. गेल्या वर्षी रेमंड लाइफस्टाइलला वेगळे करून स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्यात आले होते.आज कल्पतरूचा शेअर ९% प्रिमिअम दराने उसळला आहे.


कल्पतरू लिमिटेड आयपीओला उत्तम प्रतिसाद न मिळता किरकोळ प्रतिसाद मिळाला होता. एकूण पाहता, इशू किंमतीपेक्षा (Issue Price) सरासरी हा शेअर ९% अधिक दराने विकला जात होता. पदार्पण करताच हा शेअर बीएसई व एनएसईवर अनुक्रमे ४५३.८०, ४५२.८० दराने विकला जात होता.


मात्र सकाळी कल्पतरूच्या समभागात (Shares) मध्ये घसरण होत ४१४ रुपयांवर सूचीबद्ध (Listed) झाला होता. आयपीओला चांगला प्रतिसाद न मिळाल्याने अपेक्षा कमी असल्या तरी मुंबईतील रिअल इस्टेट फर्म कल्पतरूने दिवसभरात शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवली, १५९० कोटी रुपयांच्या आयपीओला मध्यम मागणी होती, एकूण सबस्क्रिप्शन २.३१ पट होते. आयपीओमध्ये ३.८४ कोटी इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू होता आणि गेल्या आठवड्यात पात्र संस्थात्मक गुंतवणू कदार (QIB) ने ३.१२ पट सबस्क्रिप्शनसह आयपीओवर बिड (बोली) लावली होती. किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) आणि बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (NII) अनुक्रमे १.४३ आणि १.४० पट आयपीओला सबस्क्राईब (Subscribe) केले होते.


लिस्टिंग मोठ्या प्रमाणात ग्रे मार्केटमधील मूडशी सुसंगत होती, जिथे कल्पतरू आयपीओ ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) पदार्पणापूर्वी स्थिर राहिला, जो दलाल स्ट्रीटच्या मंद भावनेचे प्रतिबिंब आहे असे तज्ञांनी या आयपीओबाबत बोलताना म्हटले. बीएसईवर शेअर ४१४.१० रुपयांवर व्यवहार करण्यास सुरुवात झाली, इश्यू किमतीपेक्षा फक्त ०.०२% जास्त, जे मंदावलेला उत्साह दर्शवत आहे.


आज रेमंड रिअल्टी सूचीबद्ध झाल्यानंतर समुह अध्यक्ष गौतम सिंघानिया म्हणाले आहेत की,आम्ही १०० वर्षे जुनी कंपनी आहोत. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या कुटुंबातील सर्वात लहान बाळ जगात एकटे पडले होते ते आज सूचीबद्ध(Listed) झाले आहेत. आम्ही इतर अनेक बिल्डर्सप्रमाणे ठाण्यातील आमच्या स्वतःच्या जमिनीपासून सुरुवात केली आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की रेमंड रियल्टी सर्वात विश्वासार्ह बिल्डरपैकी एक बनली आहे.'


Ellenbarrie Industrial Limited देखील सूचीबद्ध -


एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅसेस कंपनीचा आयपीओ (IPO) देखील आज सूचीबद्ध (Listed) झाला आहे. ४०० रुपयांच्या इशू किंमतीपेक्षा ९२ रूपये प्रिमियम दराने बीएसईवर सूचीबद्ध झाला तर एनएसईवर हा शेअर ४८६ रूपयांवर सूचीबद्ध झाला आहे. दुपारपर्यंत या शेअर्समध्ये १३४.६० रुपयांनी (३३.६५%) वाढ झाली होती. कंपनीने ४०० रुपये प्राईज बँड निश्चित केली होती. कंपनीला एकूण २२.१९ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी २.१४ वेळा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६४.२३ वेळा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १५.२१ पटीने सबस्क्राईब केले होते. अधिकृत लिस्टिंगपूर्वी, ग्रे मार्केटमध्ये या शेअरची चांगली हवा होती. ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) त्याच्या पदार्पणाच्या काही तास आधी प्रति शेअर ५७ रुपये प्रिमियम दराने विकला जात होता. आगामी काळात हा शेअर १४.२५% वाढण्याची शक्यता वाढेल असे काही तज्ञांनी म्हटले होते. एकूणच या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Comments
Add Comment

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही