महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी
मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा सेनेचे उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे प्रत्यक्षात एकत्र येण्याआधीच महाआघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने उबाठा सेनेला जोरदार झटका दिला आहे. मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असून कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांच्या पक्षाचे विचार आणि काँग्रेसचे विचार भिन्न असल्याचे सांगत मनसेच्या हिंदी भाषिकांच्या भूमिकेवरून फारकत घेतली आहे.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी तळांना धूळ चारली ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला सोमवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून उबाठाचे उद्धव ठाकरे तसेच मनसेचे प्रमुख उबाठा सेनेचे नेते अस्वस्थ रमेश चेन्नीथल्ला यांच्या या भूमिकेमुळे उबाठा सेनेच्या पोटात गोळा आला आहे.
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामुख्याने मुंबईत मुस्लीम मतदार काँग्रेसमुळे मोठ्या प्रमाणावर उबाठा सेनेकडे वळला होता. मुंबईत उबाठा सेनेच्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या जागा जिंकून आल्या, त्यामध्ये मुस्लीम आणि दलित मतदारांचा सिंहाचा वाटा होता. हे मतदार एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच उबाठा सेनेकडे वळण्याचे प्रमुख कारण काँग्रेसची विचारधारा हे आहे. त्यामुळे महाआघाडीपासून फारकत घेऊन जर का काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली तर त्याचा सर्वात मोठा फटका उबाठा सेनेच्या मुस्लीम वोट बँकेवर पर्यायाने मुंबईतील जागांच्या विजयावरही परिणाम होणार आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या या भूमिकेमुळे उबाठा सेनेचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की मनसेची हिंदी भाषिकांबाबतची भूमिका काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून तो सर्व धर्मीयांचा तसेच सर्व भाषकांचा आदर करणारा आणि सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. त्यामुळे राज ठाकरेंबरोबर काँग्रेस जाणार नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले.
याबाबत सात जुलै रोजी मुंबई येथे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार असून या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मविआतील फूट भाजपाच्या पथ्यावर पडणार
महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी देखील याबाबत बोलताना मनसे आणि काँग्रेसचे विचार वेगवेगळे असून काँग्रेस हा हिंदी भाषकांसहित सर्वांना सामावून घेणारा राष्ट्रीय पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज, उद्धव एकत्र येणार की वेगवेगळे लढणार याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नसले तरी या दोघा भावांच्या राजकीय सारीपाटावर एकत्र येण्याच्या शक्यतेने महाविकास आघाडीत फूट पडण्याची चिन्हे निर्माण झाली असून ही गोष्ट महायुतीच्या विशेषतः भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.