वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची चालतीबोलती गाथा. याच वारीतील एक अनमोल क्षण म्हणजे पालखी सोहळ्यातील अश्वांचे रिंगण! पालखी सोहळ्यात अश्वाचे रिंगण हा आकर्षणाचा अन् चैतन्य फुलवणारा सोहळा असतो. वारकरी वाटचाल करत असतात. त्याबरोबर अश्चही असतात. या अश्वांना वारकरी माऊली असेच मानतात. पळणे हा अश्वाचा स्थायिभाव असतो, त्यांना पळण्यासाठी कुठेतरी जागा करून द्यावी; हा त्यामागचा उद्देश असतो.


रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर – तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विणेकरी हे स्वतंत्र रित्या पळतात. रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो.



आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून शेकडो संतांचे पालखी सोहळे पंढरपूरला येतात. या पालखी सोहळ्यातले एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण. हे रिंगण कसं केलं जातं, याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. नुकतचं इंदापुरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रिंगण पार पडले. गोल रिंगणासाठी जमीन चांगली तयारी करावी लागते. या रिंगणाच्या स्थळी सर्वात मध्यभागी एक गोल रिंगण तयार केले जाते. त्यात मध्यभागी पालखी स्थानापन्न केली जाते. त्या रिंगणाबाहेर पालखीकडे पाठ करून प्रेक्षक बसलेले असतात. त्यानंतर अश्व दौडण्यासाठी गोलाकार धावपट्टी तयार केली जाते. धावपट्टीच्या दुसर्‍या बाजूला प्रेक्षकांना बसण्याची सोय केली जाते आणि त्यामागे दिंडीकर्‍यांनी गोलाकार कडे केलेले असते.



पालखी विराजमान झाली की, आपोआप रिंगण तयारच होते. तयार झालेल्या धावपट्टीवर अश्वांना दौडण्यासाठी सोडून देण्यात येते. त्याची ही दौड अवघा आसमंत डोळ्यात प्राण आणून पाहतो. या रिंगणानंतर चोपदार प्रत्येक दिंडीला उडीच्या खेळाचे निमंत्रण देतात. सर्व दिंड्या मिळून पालखीला मध्यभागी ठेवून एका तालासुरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत, विविध खेळांचे प्रदर्शन घडवतात. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष.. तुकाराम तुकाराम असा टिपेला पोहोचतो आणि उडीचा खेळ समाप्त होतो.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी