Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनासाठी सुलभा खोडके तालिका सभाध्यक्ष

मुंबई: राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ला आज सोमवार दिनांक ३० जुनपासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभाअध्यक्ष म्हणून जेष्ठ विधानसभा सदस्य सुलभा संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालविण्यासाठी पीठासीन सभाअध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर यांच्याबरोबरच सभागृह चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून सुलभाताई संजय खोडके यांचे नाव घोषित झाल्याने सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील उपस्थित होते.

तालिका अध्यक्षांचे काम काय असते?


राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणत: आठ तासांचे कामकाज चालणे अपेक्षित असते . अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार करण्यात येते. या पॅनलवर महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ८ पोट नियम १ अन्वये तालिका सभाध्यक्ष म्हणून आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सुलभा खोडके ह्या महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आल्या असून एक अभ्यासू व विधानसभेच्या कामकाजही उत्तम जाण असलेल्या जेष्ठ सदस्य म्हणून सुद्धा त्यांची सभागृहात ओळख आहे. विधानसभेत ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात. त्या पक्षातील जेष्ठ सदस्यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून अधिवेशन काळात घोषणा करण्यात येते. त्यानुसार अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांची पावसाळी अधिवेशनाच्या तालिका सभाध्यक्ष म्हणून घोषणा झाली असून पीठासीन अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अनुपस्थितीत त्या अधिवेशनाचे कामकाज सांभाळणार आहेत.
Comments
Add Comment

Health Tips : शरीराला एका दिवसात किती तेलाची गरज असते? जाणून घ्या योग्य प्रमाण, अन्यथा होतील भयंकर आजार

भारतीय स्वयंपाकात तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भाजीला फोडणी देण्यापासून ते पराठे आणि तळलेले पदार्थ

Yaad Lagla Song Release : आकाश यादव - पूजा चव्हाण यांचं “याड लागलं” हे रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतेय प्रेक्षकांची पसंती!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक मनमोहक नविन गाणं “याड लागलं” प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Weekend Vibes : या विकेंडला बाहेर जायचा कंटाळा आलाय ? काहीतरी वेगळं करायचं आहे ? मग या गोष्टी नक्की ट्राय करून बघा

मुंबई : आठवडाभर कामाच्या धावपळीनंतर वीकेंडला आराम करावासा वाटतो. पण दरवेळी बाहेर फिरणे, मॉलमध्ये जाणे किंवा

बूथ पातळीवर संघटन मजबूतीबरोबरच कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचना

पक्षाकडून प्रत्येक विषय दिला जाईल आणि त्यावर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करायचे आहे, अशा

Nashik : सिंहस्थासाठी गोदावरी स्वच्छ, प्रदूषणमुक्त ठेवण्यावर भर; घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचे आतापासूनच नियोजन करा - मंत्री पंकजा मुंडे

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) देश-विदेशातून मोठ्या