अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी होती. सर्वच स्तरातून सातत्याने नवीन बसेसची मागणी केली जात होती. अखेर स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून मुरुड आगाराला पाच नवीन लाल परी महामंडळाकडून देण्यात आल्या असून त्यांचे आ.दळवींच्या हस्ते शनिवारी सकाळी श्रीफळ वाढवून व फित कापुन त्यांचे लोकार्पण करण्यात आले.



मुरूड आगारात झालेल्या या शानदार सोहळ्याला पेणचे विभागीय नियंत्रक दिपक घोडे, यंत्र अभियंता संदीप शिंदे, आगार व्यवस्थापक राहुल शिंदे,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी म्हणाले की,मुरुडकरांची कित्येक वर्षाची नवीन बसेसची मागणी पूर्ण करताना आनंद होतो. पर्यटनस्थळी प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्य मंत्री व परिवहनमंत्र्यांकडे आपण सतत पाठपुरावा केला होता, साळाव पुलाची दुरुस्ती झाली.


त्यामुळे नवीन बसेसना त्यावरुन जाण्यासाठी कार्यकारी अभियंता एम. एम धायतडक यांनी आता एसटी नियंत्रकांना परवानगीचे पत्र दिल्याचेही सांगितले. प्रत्येक डेपोसाठी मेघा भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात मुरुड आगाराचा विशेष उल्लेख करुन त्याला भरघोस निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

Comments
Add Comment

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार

नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

नगराध्यक्ष-नगरसेवक पदांसाठी ६२९ उमेदवार रिंगणात, उद्या संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपणार अडीच लाख मतदार ठरविणार