Dhananjay Munde : धनंजय मुंडे अज्ञातवासातून परतताच संदीप क्षीरसागरांवर पहिला हल्ला; कोचिंग क्लासमधील अत्याचार प्रकरणावरुन बीडचं राजकारण खवळलं

मुंबई : बीडच्या एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट'च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली असताना या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतल्याचं चित्र आहे. अशातच आता या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आक्रमक झाले आहेत. मुंडे यांनी थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमदार क्षीरसागर आरोपीसोबत होते, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. तसेच पोलिस तपासावरही त्यांनी शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणाची (SIT) चौकशी करण्याची गरज असल्याचं धनंजय मुंडे यांनी मागणी केली आहे.




काय म्हणाले धनंजय मुंडे?


यावेळी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत धनंजय मुंडे म्हणाले की, लहान मुलीवर सतत एक वर्ष लैंगिक अत्याचार झालेला आहे. ज्या कोचिंगमध्ये ही मुलगी जात होती त्याच कोचिंगच्या मालकाने आणि पार्टनरने मिळून कृत्य केलं. या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्यांचा राजकीय वारदहस्त आहे. जे लोक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी मिळून केलेलं हे कारस्थान आहे. मी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, त्या अल्पवयीन भगिनीने जो अत्याचार सहन केला. त्याची पीडा ती स्वतः व तिचे पालकच समजू शकतात. मात्र, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सोबत होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांचे संबंध नेमके कशाचे आहेत? हे संबंध आर्थिक आहेत की आणखी काही असा घणाघात धनंजय मुंडे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची महिला आयपीएस अधिकार्‍यामार्फत एसआयटी नेमून चौकशी केली जावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.


बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलात घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर धनंजय मुंडे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. उमाकिर मध्ये एक प्रकार समोर आलाय, मात्र अशा अनेक घटना घडलेल्या असाव्यात असा संशय असल्याचे धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. कमी शुल्काचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना वाममार्गाला लावण्याचा प्रकार विजय पवार व त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून होत होता, असा दावाही धनंजय मुंडे यांनी केला आहे.



याशिवाय ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, त्या मुलीच्या आई-वडिलांनी ठरवलं की आपण आत्महत्या करावी. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सगळं सांगितलं. तर पोलीस म्हणतात आम्ही व्यवस्थित तपास करू. पोस्को केसमध्ये दोन दिवसाची पोलीस कस्टडी आरोपीला सुनावण्यात आली आहे. मात्र त्या पीडित मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा आपला सुद्धा आहे, असा पवित्रा आता धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.


अशा नीच वृत्तीच्या लोकांनी असे किती गुन्हे याआधी केलेत तेही उघड होऊन यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच खाजगी कोचिंग क्लासेस चालकांना फी वसुली सहसुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून एक संहिता लागू असावी, याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, फारुक पटेल, ॲड. गोविंद फड, दादासाहेब मुंडे, भागवत तावरे, यांसह याप्रकरणी आंदोलन पुकारलेले पालक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या