Karnataka Bank: सीईओच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक बँकेचे शेअर 'इतक्या' % Crash

प्रतिनिधी: कर्नाटक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या राजीनाम्याने बँकेचा समभाग दुपारी २ वाजेपर्यंत ५.२८% कोसळला आहे. प्रामुख्याने बँकेच्या अंतर्गत कलहातून बँकेचे श्रीकृष्णन हरी सरमा यांच्या राजीनाम्याने बँकेचा समभाग गडगडला. सलमा यांच्या व्यतिरिक्त कार्यकारी संचालक सेखर राव यांनीही राजीनामा दिला होता.दुपारी १२ वाजेपर्यंत ८% कोसळला होता. सीईओ सेखर यांनी राजीनामा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक दारांनी काऊंटर सेलिंग माध्यमातून शेअर्सची विक्री केल्याची शक्यता आहे.


यामुळे बँकेच्या समभागांत गुंतवणूकदारांना मोठे नुकसान अपेक्षित आहे. रविवारीच सेबीकडे केलेल्या नियामक (रेग्युलेटरी) फायलिंगमध्ये (Regulatory Filings) मध्ये बँकेने सेखर राव यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले होते. त्यामुळे बाजा रात उलटसुलट चर्चा झाल्याने बँकेचे धाबे दणाणले होते.


फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे, ' कर्नाटक बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णन हरी हरा सरमा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांचा राजीनामा १५ जुलै २०२५ पासून लागू होईल. सरमा यांनी वैयक्तिक कारणे आणि मुंबईत परत जाण्याचा निर्णय दिला. कार्यकारी संचालक शेखर राव यांनीही मंगळुरू येथे जाण्यास असमर्थता आणि इतर वैयक्तिक कारणे सांगून राजीनामा दिला आहे.त्यांचा राजीनामा जुलैपासून लागू होईल.' असे बँकेने म्हटले आहे.


कर्नाटक बँक लिमिटेड ही मुख्य प्रवाहातील खाजगी बँक आहे. १९२४ पासून ही बँक कार्यरत असून मंगलोर कर्नाटक येथे बँकेचे मुख्य कार्यालय आहे. गेल्या काही वर्षांत बँकेच्या आर्थिक स्थितीत चांगली कामगिरी दर्शविली गेली होती. 'अ' दर्जाची व्यवसायिक बँक म्हणून ओळख असलेल्या बँकेच्या विस्तारीकरणात चांगली वाढ झाली असताना अचानक बँकेच्या नेतृत्वाने दिलेल्या राजीनाम्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेच्या अंतर्गत मतभेदातून हा निर्णय नेतृत्वाने घेतला होता. मात्र याबद्दल आणखी माहिती मिळू शकलेली नाही.


मे ३० पर्यंत बँक प्रति समभाग किंमत १९७.९१ रुपये होती जी ३० जूनला १९६.२५ रूपयांवर गेली आहे. बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता (Volatility) कायम होती. अंतिमतः आज शेअर मोठ्या प्रमाणात कोसळला आहे.


संचालक मंडळाने एमडी, सीईओ आणि कार्यकारी संचालक पदांसाठी नवीन उमेदवार शोधण्यासाठी एक शोध समिती स्थापन केली आहे. बँकेने एका अनुभवी वरिष्ठ बँकरची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे जो २ जुलै पासून पदभार स्विकारणार आहे असे सांगण्यात आले आहे. नियामक मंजुरीसह पर्यायी व्यवस्था देखील केली जात आहे.


माध्यमांच्या माहितीनुसार, ऑडिटर्सनी बोर्डाच्या योग्य मंजुरीशिवाय सुमारे १.५३ कोटी रुपयांचा विना परवानगी खर्च उघडकीस आणला होता. बँकेने म्हटल्याप्रमाणे, या प्रकरणावर चर्चा झाली असून ते सौहार्दपूर्णपणे सोडवले गेले आहेत.


कर्नाटक बँकेने आपल्या निवेदनात भागधारकांना आश्वासन दिले की ते चांगले भांडवलदार आणि ऑपरेशनलदृष्ट्या स्थिर आहे.बँकेने असेही म्हटले आहे की व्यवस्थापनात बदल झाले असले तरी त्यांचा यशस्वी परिवर्तनाचा प्रवास कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहणार आहे. बँकेला ३१ मार्च २०२५ पर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ८% घट झाली होती आहे जी २५२.४ कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २७४.२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.

Comments
Add Comment

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं