रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट ठार

क्वीव: युक्रेनच्या हवाई हद्दीवर रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यात एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट मृत्युमुखी पडला आहे. काही दिवसांपूर्वीच नाटो शिखर परिषद संपल्यानंतर रशियाने हा हल्ला केला आहे. या शिखर परिषदेत जगातील सामर्थ्यवान राष्ट्रप्रमुखांनी ३ वर्षांपासून सुरू असलेले हे रशिया युक्रेन युद्ध लवकर संपवण्याचे आवाहन केले होते.  

तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात रशियाने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या एफ-१६ लढाऊ विमानाचा पायलट मृत्युमुखी पडला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की रशियाने रात्रभर ५३७ शस्त्रांसह युक्रेनवर हवाई हल्ला केला आहे. त्यात ४७७ ड्रोन आणि ६० क्षेपणास्त्रे होती. या हल्ल्याची माहिती देताना अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, या हल्ल्यातील दुःखद भाग म्हणजे रशियन हल्ल्याला निष्क्रिय करण्यात गुंतलेले एफ-१६ विमानाचे पायलट मॅक्सिम उस्टेन्को रशियन हल्ल्याच्या तावडीत सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

झेलेन्स्की पुढे म्हणाले की, "या एफ-१६ च्या पायलटनी शत्रूची ७ हवाई लक्ष्ये नष्ट केली आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना माझी संवेदना. त्यांच्या मृत्यूच्या सर्व परिस्थितीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."

झेलेन्स्की यांच्या मते, रशियाने ज्या ड्रोनने हल्ला केला त्यापैकी बहुतेक ड्रोन इराणमध्ये बनवले गेले होते.  ते पुढे म्हणाले की, स्मिला येथील एक निवासी इमारत देखील या रशियन सैन्याच्या हल्ल्यांत लक्ष्य बनली आहे. ज्यामध्ये एक लहान मूल जखमी झाले.

रशियावर टीका करताना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले की, 'मोस्कोकडे मोठे हल्ले करण्याची क्षमता आहे तोपर्यंत ते थांबणार नाही.' या आठवड्यातच ११४ हून अधिक क्षेपणास्त्रे, १,२७० हून अधिक ड्रोन आणि सुमारे १,१०० ग्लाइड बॉम्ब डागण्यात आले आहेत. जगाच्या शांततेच्या आवाहनाला न जुमानता पुतिन यांनी युद्ध सुरू ठेवण्याचा निर्णय खूप आधीच घेतला होता. जे आता थांबवले पाहिजे." असे देखील  झेलेन्स्की यांनी आपले मत मांडले. त्यासाठी त्यांनी जगातील देशांना पुतिनवर अधिक दबाव आणण्याचे आवाहन केले.

युक्रेनियन हवाई दलाचा प्रतिकार


युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की त्यांनी रशियाचे २४९ ड्रोन हल्ले अडवले आणि निष्क्रिय करण्यास मदत केली. ज्यामधील २२६ आकाशात नष्ट केली. एपी नुसार, हे ड्रोन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जाम झाले आहेत. युक्रेनने हे ड्रोन अडवल्याचा दावा केला असेल, परंतु यामुळे युक्रेनच्या नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

सर्वात मोठा हवाई हल्ला


युक्रेनच्या हवाई दलाचे संपर्क प्रमुख युरी इहनाट म्हणाले की, रशियाने रात्री केलेला हा हल्ला देशावरील "सर्वात मोठा हवाई हल्ला" होता, ज्यामध्ये ड्रोन आणि विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. या हल्ल्यात युक्रेनच्या पश्चिमेकडील भागांसह संपूर्ण प्रदेशाला लक्ष्य करण्यात आले, जे आघाडीच्या रेषेपासून दूर होते. 

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की रशियाने डागलेल्या शस्त्रांमध्ये २११ इराणी शाहेद ड्रोन होते. तर काही इतर युएव्ही होते. युक्रेनियन सैन्याने २२५ शस्त्रे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जॅम करून नष्ट केली. याव्यतिरिक्त, रशियाने १ इस्कंदर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. युक्रेनने ३३ इस्कंदर क्रूझ क्षेपणास्त्रे पाडली. याशिवाय ४ कालिबर क्रूझ क्षेपणास्त्रांवरही हल्ला करण्यात आला.
Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील

मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत… लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का

  इथिओपिया : आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. आज

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे

इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश कैरो : जगभरातील