गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

  67

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल


मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळावे, म्हणून चाकरमान्यांनी गेल्या चार दिवसांपासून दादर, भांडुप, विक्रोळी वाणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडक्यांवर रांगा लावल्या होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कोकण रेल्वेचे बुकिंग सुरू झाले आणि अवघ्या दोन मिनिटांत कोकणात जाणाऱ्या सगळ्याच रेल्वे गाडया फुल्ल झाल्या. मात्र रांगेतील पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले, तर दुसऱ्याला आरएसीवर समाधान मानावे लागले. इतरांच्या वाटयाला वेटिंग तिकीटही न आल्याने संताप व्यक्त होत आहे.


गणपतीला कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट आम्हाला मिळत नाही, तर नेमके कोण बुक करत आहे? असा सवाल चाकरमनी विचारत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये १२६ तिकीट आरक्षण खिडक्या असून, या सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तिकीट विक्री बंद कराव्यात, अत्ते चाकरमान्यांचे म्हणणे आहे.


मध्य रेल्वेने सांगितल्यानुसार कोकण रेल्वेने मागणी केल्पास दिव्यावरून ५०० पेक्षा अधिक विशेष गाड्या चालविण्याची मध्य रेल्वेची तयारी आहे; परंतु कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे सुरक्षेच्या करणास्तव गाड्यांची संख्या कमी आणि धिमी करण्यात येते. तसेच, वेटिंग तिकिटांचा कोटा ट्रेनच्या एकूण कोट्यापेक्षा २५ टक्के ठेवण्यात आल्या आहेत, मात्र, रांगेत कोणालाही वेटिंग तिकीट मिळत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.



प्रवाशांची रेल्वे प्रशासनावर आगपाखड


अनेक प्रवासी तिकीट मिळवण्यासाठी सलग चार दिवस रांग लावत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे स्थानकावील आरक्षण केंद्रावर ८ तिकीट खिडक्या असून, प्रत्येक खिडकीवर किमान १० ते १२ प्रवासी रागेत उभे होते. विकीट खिडकी सकाळी ८ वाजता सुरू झाली, परंतु रांगेत असलेल्या केवळ पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले, तर त्या मागच्या एका प्रवासाला आरएसी तिकीट मिळाले, केवळ २ मिनिटामध्ये सर्व तिकिट संपल्याने रांगेतल्या प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावर रोष पाहायला मिळाला, दादर आणि भांडुप स्थानकात देखील अशीय काहीशी परिस्थिती होती.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली