दोन लाखांच्या बनावट नोटासह तिघे जेरबंद ; राहुरी पोलिसांची कारवाई

राहुरी : राहुरी पोलिसांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री शहराच्या हद्दीत मोठी कारवाई करत दोन लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन दुचाकीवर राहुरीकडे येत असल्याची गुप्त माहिती राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना शनिवारी दि. २८ जून रोजी रात्री ११ वाजण्याचे दरम्यान मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलिस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला. काही वेळाने तेथे एम एच ४५ वाय ४८३३ क्रमांकाच्या दुचाकीवर तिन इसम आले असता, पोलिस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले. पथकाने त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळ २ लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ॲक्सीस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली. त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले. हवालदार सुरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी पप्पु ऊर्फ प्रतीक भारत पवार, वय ३३ वर्ष, रा. अर्जुन नगर, ता. करमाळा, जि. सोलापुर, तसेच राजेंद्र कोंडीबा चौघुले, वय ४२ वर्षे, तात्या विश्वनाथ हजारे, वय ४० वर्षे, दोघे रा. पाटेगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा रजि. नं. ७२४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८०, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी २०० व ५०० च्या बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते? त्यांनी नोटा कोठून आणल्या? यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत? या बाबतचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे हे करीत आहे.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे, नदिम शेख, सतिष कुऱ्हाडे, अंकुश भोसले, चालक शकुर सय्यद आदि पोलिस पथकाने केली.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई