Rule Change: १ जुलैपासून देशात होणार 'हे' मोठे बदल, काय होणार महाग आणि स्वस्त? जाणून घ्या

१ जुलैपासून होणार हे महत्वाचे बदल 


मुंबई: जुलै महिना एक दिवसानंतर सुरू होणार आहे, या महिन्यात अनेक मोठे बदल घडून येणार आहेत.  त्याचा परिणाम सामान्याच्या खिशाला आणि स्वयंपाकघराच्या बजेटवर देखील पडणार आहे.  तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि वाहनचालकांवर देखील याचा परिणाम दिसून येणार आहे. 


दर महिन्याला पहिल्या तारखेपासून देशात अनेक मोठे बदल लागू केले जातात. ज्यामध्ये घराच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते क्रेडिट कार्ड वापरावरील शुल्कामध्ये वाढ किंवा कमी यांचा समावेश असतो. त्यानुसार येत्या १ जुलै पासून नवीन बदल लागू होणार आहेत. एवढेच नाही तर भारतीय रेल्वे १ जुलैपासून आपले नियम (Indian Railway Rule Change) बदलणार आहे.



घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये बदल


नवीन महिना म्हंटला की सामान्याच्या नजरा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीवर असतात. जूनच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या आणि त्यात प्रति सिलेंडर २४ रुपयांपर्यंत कपात केली होती. तथापि, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बऱ्याच काळापासून तशाच आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्या किमतींमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे. एलपीजीच्या किमतीसोबतच, कंपन्या विमान इंधनाच्या किमतीत देखील बदल होऊ शकतात. ज्याचा परिणाम विमानाप्रवास शुल्कावर होईल.



युपीआय चार्जबॅकचा नवीन नियम


आत्तापर्यंत कोणत्याही व्यवहारांमध्ये चार्जबॅकसाठी क्लेम रिजेक्ट केल्यास बॅंकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी घेत पुन्हा प्रक्रिया करावी लागत होती. आता २० जून २०२५ च्या नियमांनुसार बॅंके स्वत: योग्य चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया दुसऱ्यांदा करु शकणार आहे. त्यासाठी एनपीसीआयच्या परवानगीची आवश्यकत नसणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे व्यवहार जलदगतीने होणार असून समाधान होणार आहे.



नवीन पॅन कार्डसाठी ‘आधार’ अनिवार्य


आयकर विभागाकडून पॅन कार्ड बनवण्याच्या नियमातही मोठा बदल होत आहे. आता जर तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी इतर कोणतेही वैध ओळखपत्र ग्राह्य धरले जात होते. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) १ जुलै २०२५ पासून आधार पडताळणी अनिवार्य केली आहे.



एचडीएफसी क्रेडिट कार्ड महाग


जुलैच्या सुरुवातीला झालेला दुसरा मोठा बदल क्रेडिट कार्डशी संबंधित असेल. जर तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर १ जुलै २०२५ पासून ते तुमच्यासाठी महाग होणार आहे. खरं तर, बँकेच्या क्रेडिट वापरकर्त्यांना युटिलिटी बिल पेमेंट करण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. याशिवाय, एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल वॉलेटमध्ये (Paytm, Mobikwik, Freecharge किंवा Ola Money) एका महिन्यात १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास १ टक्के शुल्क आकारले जाईल.



आयसीआयसीआय एटीएम शुल्क लागू


तिसरा आर्थिक बदल आयसीआयसीआय बँकेशी संबंधित आहे आणि मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या ५ मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास २३ रुपये शुल्क लागू होईल. मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये, ही मर्यादा तीन निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, जर आपण IMPS ट्रान्सफरवरील नवीन शुल्काबद्दल बोललो तर, १००० रुपयांपर्यंतच्या पैसे ट्रान्सफरवर प्रति व्यवहार २.५० रुपये, त्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्सफरवर ५ रुपये आणि १ लाखांपेक्षा जास्त आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर १५ रुपये आकारले जातील.



रेल्वे तिकीटच्या तात्काळ बुकिंगसाठी ‘OTP’ आणि ‘आधार’ बंधनकारक


IRCTC च्या वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आता ‘आधार पडताळणी’ (Aadhaar Verification) आवश्यक असेल. याव्यतिरिक्त, १५ जुलै २०२५ पासून, तुम्ही तिकीट ऑनलाइन बुक करत असाल किंवा रेल्वे आरक्षण काउंटरवरून (PRS Counter) तिकीट घेत असाल, तरी तुम्हाला OTP टाकावा लागणार आहे. या बदलांबरोबरच, एसी क्लासच्या तिकिटांसाठी सकाळी १० ते १०:३० पर्यंत, तर नॉन-एसी तिकिटांसाठी सकाळी ११ ते ११:३० पर्यंत या मर्यादित वेळेत काढता येणार आहे. अधिकृत तिकीट एजंट आता बुकिंग विंडो उघडण्यापूर्वी ३० मिनिटे आधी तात्काळ तिकिटे बुक करू शकणार नाहीत.


 

 
Comments
Add Comment

WPI Inflation: घाऊक ग्राहक किंमत महागाईत डिसेंबरमध्ये किरकोळ वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण: प्राथमिक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने यंदा घाऊक ग्राहक किंमती निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ०.८६%

BMC Election Result 2026 : मुंबईत 'महायुती'चा झंझावात! भाजप-शिंदे गटाने गाठलं 'शतक'; महापालिकेत सत्तांतराचे स्पष्ट संकेत

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज मोठा उलटफेर पाहायला

Mumbai BMC Election Results 2026 LIVE Counting : मतमोजणीच्या अडीच तासांनंतर 'हे' उमेदवार ठरले विजयी; पाहा विजयी उमेदवारांची पहिली यादी

वॉर्ड २ – तेजस्वी घोसाळकर (भाजप) वॉर्ड १९ – प्रकाश तवडे (भाजप) वॉर्ड २० – दीपक तवडे (भाजप) वॉर्ड 36 – सिद्धार्थ

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग

इन्फोसिस शेअरमध्ये सकाळी ६% तुफान वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये ६% पातळीवर तुफान वाढ झाली आहे. इन्फोसिस कंपनीच्या

Explainer: भाजप महायुती बीएमसी जिंकल्यास अर्थकारणावर सकारात्मक परिणाम? काय म्हणाले तज्ज्ञ वाचाच

मोहित सोमण: प्रामुख्याने आज २९ महानगरपालिकांचा निर्णय लागताना खरं तर मुंबईसह संपूर्ण देशाचे लक्ष बृहन्मुंबई