पेशवेकालीन कागदपत्रांमधून उलगडला किल्ले मानगडाचा इतिहास

टेहाळणीसाठी किल्ल्याचे विशेष महत्त्व


माणगाव : दुर्गराज किल्ले रायगडाचा उपदुर्ग समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक किल्ले मानगडाच्या संदर्भातील पेशवेकालीन नोंदी सापडल्या असून यामुळे मानगडाच्या इतिहासाचे अनेक अपरिचित पैलू उलगडले आहेत .


पुणे पुराभिलेख कार्यालयातील मोडीलिपी कागदपत्रांमधून किल्ले मानगडावर वेताळ बुरुज, गडदचा बुरुज, सबजा बुरुज, फत्या बुरुज, नगारा बुरुज असे तब्बल चौदा बुरुजांची नावे सापडल्याने शिवकाळात टेहळणीसाठी मानगडाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


पुण्यातील इतिहास अभ्यासक तसेच मोडीलिपी अभ्यासक राज ऊर्फ योगेंद्र मेमाणे यांनी शोधलेल्या इसवी सन १७८४ मधील या नोंदींनुसार मानगडावरील इमारती सदर, दिवाणघर, चिरेबंदी कोठी, मोदीखाना ( तोफखाना ), बंगला, तारांगणनजीकची दिंड , कोठी आरकसी असा उल्लेखही सापडला आहे. विशेष बाब म्हणजे मानगडावरील एका पाण्याच्या टाक्याचे नाव ‘गंगासागर’ असल्याची महत्त्वपूर्ण नोंदही आढळली आहे.


किल्ले मानगडावरील पेशवेकालीन संरक्षण व्यवस्थेमधील अधिकारी सरनोबत , सरनाईक, कारखानीस, सबनीस असे असून त्यामध्ये सरदार तुळाजीराव पासलकर, हवालदार निम्हण आणि जनार्दन गोविंद फडणीस यांची नावेसुद्धा कागदपत्रांमधून उजेडात आली आहेत.


गडावर विंझाई, भैरव आणि सबजाई या तीन देवतांची मंदिरे सन १७८४ मध्ये अस्तित्वात असल्याचेही या मोडीलिपीतील कागदपत्रांमधून उलगडले आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या १११ किल्ल्यांच्या यादीत मानगडाचा उल्लेख असून नव्याने उजेडात आलेल्या या पेशवेकालीन कागदपत्रांचे महत्व इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे असे मत मानगड अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केले. टेहळणीसाठीचा गड म्हणून मानगडाचे विशेष महत्त्व आहे.

Comments
Add Comment

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,