ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

  60

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न


ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल स्कूल’ आणि ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात शनिवारी, २८ जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये मुंबई महानगर क्षेत्रातील (एम. एम. आर.) पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. ठाण्यातील तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची कवाडे खुली करून देण्याच्या हेतूने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे स्पेस एज्युकेशन लॅब निर्मित करण्यात येणार आहे. याप्रसंगी अंबर स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम यांनी देखील आपली भूमिका मांडली. ही स्पेस लॅब विद्यार्थ्यांसाठी सहभागशील करण्याच्या दृष्टीने भर देणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. आमचा उद्देश भावी अंतराळवीर, अ‍ॅस्ट्रोफिजीसिस्ट, स्पेस सायंटिस्ट आणि एअरोस्पेस इंजिनिअर्स घडवण्याचा आहे, असे संचालक लक्ष्मण कदम यांनी यावेळी नमूद केले. व्योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव यांनी या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची मूलभूत ओळख होईल आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला. अंतराळ संशोधक क्षेत्राचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रतीक मुणगेकर यावेळी म्हणाले की, “विद्यार्थ्यांना शालेय वयातच अंतराळ संशोधन क्षेत्राची ओळख करून देणाऱ्या विशेष पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिल्यास याक्षेत्रात मराठी टक्का वाढेल. शाळांमध्ये स्पेससायन्स आणि इनोव्हेशन लॅब्स स्थापल्यास ग्रामीण व शहरी अशा दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडता येईल.”


शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी या स्पेस लॅबच्या माध्यमातून शिक्षण रंजक आणि प्रेरणादायी करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध