मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

  66

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा!


मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रचास करून अगदी वेळेवर गरम डबा पोहोचवणारे आपले सगळ्यांचे लाडके मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत. त्यांच्या कामाची अचूकता जगभरात प्रसिद्ध आहे. पण एक दिवस असा असतो, जेव्हा हे डबेवाले कामापेक्षा आपल्या श्रद्धेला महत्त्व देतात. येत्या सोमवारी, ७ जुलै २०२५ रोजी हेच डबेवाले आपली डबे पोहोचवण्याची सेवा एक दिवसासाठी बंद ठेवणार आहेत. आषाढी एकादशीच्या वारीला जायचे असल्याने, मुंबईचे डबेवाले एक दिवसाची सुट्टी घेणार आहेत. 'मुंबई डबेवाला' असोसिएशनने खास याबाबतची घोषणा केली आहे. त्यांच अनेक सदस्य पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्यासाठी जातात, त्यामुळे या दिवशी डबेवाटप बंद राहील, असे त्यांनी आपल्या ग्राहकांना कळवलं आहे.


आषाढी एकादशीला हजारो वारकरी, म्हणजे विठ्ठलाचे भक्त, दिवसेंदिवस पायी चालत, असीम श्रद्धेने पंढरपूरकड़े जातात. हा प्रवास आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संपतो. तिथे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान संतांचा जयजयकार होतो. डबेवाल्यांसाठी ही वारी केवळ धार्मिक विधी नाही, तर तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.


मुंबई डबेवाला असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने 'मिड डे'शी बोलताना सांगितलं, वारी म्हणजे आम्ही कोण आहोत, याचा एक भाग आहे. यामुळे आम्हाला आमची मूल्यं, आमचा समृद्ध वारसा आणि आपलेपणाची भावना पुन्हा एकदा अनुभवता येते. म्हणूनच, दरवर्षी आमच्यापैकी बरेच जण पंढरपूरला पायी जातात. आणि यासाठीच, ७जुलै रोजी आम्ही आमची डबे सेवा बंद ठेवून या पवित्र यात्रेत सामील होणार आहोत." डबेवाल्यांची ही सेवा दररोज मुंबईतील हजारो ऑफिस कर्मचाऱ्यांपर्यंत घरचे ताजे जेवण पोहोचवते. पण वर्षातून एकदा, त्यांची ही धार्मिक निष्ठा त्यांना पंढरपूरला घेऊन जाते, त्यांची ही सुट्टी एक दिवसाचीच असून, पुढील दिवसापासून, म्हणजे ८ जुलै २०२५ पासून, डबेवाल्यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरू होईल. त्यामुळे, मुंबईतील सर्व ऑफिसवाल्यांना ७जुलै रोजी दुपारच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था स्वतःच करावी लागेल.

Comments
Add Comment

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी