केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. काँग्रेसचा या निर्णयाला विरोध आहे. विशिष्ट नृत्य प्रकार शिकण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर विरोध झाला तरी निर्णय बदलणार नाही, असे स्पष्ट संकेत केरळचे मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते पिनरायी विजयन यांनी दिले आहेत.

शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी झुंबा सक्ती या विषयावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस निरर्थक वाद निर्माण करत असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असा कोणताही निर्णय केरळ सरकारने घेतलेला नाही आणि घेणार नाही; असे ते म्हणाले.

झुंबा शाळेत शिकवण्यामागे केरळ सरकारची स्पष्ट अशी एक भूमिका आहे. ती समजून घेण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेचे स्वागत आहे. पण विरोधासाठी होणाऱ्या विरोधाला डावलले जाईल; असे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी सांगितले. झुंबा नृत्य केल्यामुळे मुलांमधील उत्साह वाढेल. मुलं फिट राहण्यास मदत होईल; असेही केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी म्हणाले. काही मुस्लिम संघटना शाळेत झुंबा शिकवण्याला विरोध करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केरळ सरकारने सांगितले.
Comments
Add Comment

'मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल', गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक

दिवाळीपूर्वी दिल्लीत 'कृत्रिम पाऊस' पाडण्याची योजना

दिल्लीच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी 'कृत्रिम पावसाचा' आधार! नवी दिल्ली: दिवाळीच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या एसी लक्झरी कोचची झलक सादर

नवी दिल्ली : इंडो-रशियन संयुक्त उपक्रम काइनेट रेल्वे सोल्युशन्सने बुधवारी राजधानीतील भारत मंडपम येथे आयोजित

बघा, तुम्ही वापरता 'ती' टूथपेस्ट नकली; फॅक्टरीचा पर्दाफाश!

बनावट ENO, Maggi, सिगारेट, कॉस्मेटिक्स नंतर आता कोलगेट, सेन्सोडाईन टूथपेस्टमध्ये भेसळ; ९.४३ लाखांचा साठा जप्त नवी