Warren Buffett Donation: आणखी एक ! ९४ वर्षीय वॉरन बफे यांची ६ अब्ज डॉलरची देणगी! २० वर्षांतील सर्वात मोठी....

प्रतिनिधी: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व सध्या जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत वॉरन बफे (Warren Buffett) यांनी गेल्या दोन दशकांमध्ये केलेली सर्वात मोठी देणगी शुक्रवारी आपल्या बर्कशायर हॅथवे कंपनीचे स्टॉक गेट्स फाऊंडेशन (Gates Foundation) व इतर चार सेवाभावी संस्थाना दिले आहेत. ६ अब्ज डॉलर्सची ही देणगी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी देणगी मानली जात आहे. वॉरन बफे यांनी आपल्या ९.४३ अब्ज मूल्यांकनाचे समभाग (Stocks) गेट्स फाऊंडेशन या नामांकित सेवादायी संस्थेच्या नावे केले आहेत. तसेच ९४३३८४ शेअर्स सुसान थॉमसन फाऊंडेशन (Susan Gates Foundation) संस्थेच्या नावे शुक्रवारी केले. यांशिवाय आपल्या तीन मुलांच्या नावे असलेल्या संस्थांना त्यांनी ६६०३६६ शेअर्स दान केले आहेत. त्यांना होवार्ड, सुसी, पीटर अशी तीन मुले आहेत.


९४ वर्षीय बफेंनी ९९.५ टक्के संपत्ती केली मुलांच्या नावे -


वॉरन बफे यांनी २००६ साली मृत्यूपत्र बनवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मागील वर्षी भर टाकत आपल्या संपत्तीतील ९९.५ % वाटा मुलांच्या चॅरिटेबल ट्रस्ट नावाने केली आहे.


काय करतात या ट्रस्ट!


बफे यांच्या कन्या सुझी बफे आईच्या नावावर असलेल्या सुसान थॉमसन बफे फाऊंडेशनचे नेतृत्व करतात. गर्भवती महिलांसाठी ही फाऊंडेशन काम करते. दुसरी फाऊंडेशन शेरवूड फाऊंडेशन विना नफा (Non Profit) संस्था आहे जी शिक्षणासाठी काम करते. तर नोव्हा फाऊंडेशन संस्था दुर्लक्षित महिला, तसेच आदिवासींच्या प्रश्नांवर काम करते.


२० वर्षातील सर्वात मोठी देणगी!


बफेट १९६५ पासून बर्कशायर हॅथवेचे संस्थापक आहेत.जो समुह आज १.०५ ट्रिलियन डॉलर्सच्या समूहात रूपांतरित झाला आहे ज्यांचे मालकी हक्क गेइको, बीएनएसएफ रेल्वे, अ‍ॅपल आणि अमेरिकन एक्सप्रेस सारख्या कंपन्यांमध्ये आहेत. ६ अब्ज डॉलर्सच्या देणगी असूनही, बफेट बर्कशायरचे पाचवे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक राहिले आहेत, वृत्तसंस्थांचा माहितीनुसार, आजही त्यांच्याकडे कंपनीमधील १३. ८% भागभांडवल आहे. त्यांनी दिलेल्या देणगीपूर्वी त्यांची एकूण संपत्ती १५२ अब्ज डॉलर्स इतकी होती.


मृत्यूनंतर होणार देणगी बंद !


बफे यांनी म्हटल्याप्रमाणे, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला त्यांच्या मरणोत्तरच देणगी बंद होईल आणि पुढील दानधर्माची सुत्र त्यांच्या तीन अपत्यांना जाणार आहे. सुझी बफेट ७१ वर्षांच्या, हॉवर्ड बफेट ७० वर्षांच्या आणि पीटर बफेट ६७ वर्षांच्या आहेत. वॉरेन बफेट १९६५ पासून ओमाहा, नेब्रास्का-आधारित बर्कशायरचे नेतृत्व करत आहेत. १.०५ ट्रिलियन डॉलर्सच्या या समूहाकडे जवळजवळ २०० व्यवसाय आहेत ज्यात गेइको कार विमा आणि बीएनएसएफ रेल्वेचा समावेश आहे आणि अ‍ॅपल (AAPL.O) यासह डझनभर स्टॉक आहेत.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे