आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे. भारत पाचव्या आणि वेस्ट इंडिज सहाव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका नव्या हंगामात अद्याप एकही कसोटी सामना खेळलेले नाहीत.

ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज विरुद्धची पहिली कसोटी १५९ धावांनी जिंकली. इंग्लंड भारताविरुद्धची पहिली कसोटी पाच गडी राखून जिंकला. या विजयांमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रत्येकी एक कसोटी सामना खेळल्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मोठ्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि मोठ्या पराभवामुळे वेस्ट इंडिज सहाव्या स्थानी आहे.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामने झाले. यातील एक अनिर्णित राहिला तर दुसरा कसोटी सामना श्रीलंकेने ७८ धावांनी जिंकला. पण अनिर्णित सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद ४९५ धावा आणि दुसऱ्या डावात सहा बाद २८५ धावा केल्या. तर श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद ४८५ आणि दुसऱ्या डावात चार बाद ७२ धावा केल्या होत्या. नंतर दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात सर्वबाद ४५८ धावा केल्या. बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद २४७ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद १३३ धावा केल्या होत्या. अनिर्णित कसोटीतील कामगिरीमुळे बांगलादेश गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे.
Comments
Add Comment

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण