कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे परिमाण उत्पादन तत्त्वावर (क्वांटिटी आऊट पुट) कार्यपद्धतीने देण्याचा महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय महापालिकेला लवकरच फिरवावा लागला आहे. ही सर्व कामे ठोक (लम्पसम)पद्धतीनेच करण्यास कंत्राटदारांची समर्थता असल्यामुळे महानगर पालिकेने कंत्राटदाराच्या भूमिकेला झुकते माप दिले असून, पुन्हा एकदा घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया ठोक स्वरूपात काम देण्याच्या पद्धतीनेच राबविण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटार सफाई, आणि वर्गीकृत तसेच विलगीकृत कचरा संकलन करणे त्याचप्रमाणे क्षेपण भूमीवर वाहतूक करणे या कामासाठी तीन वर्षांकरिता निविदा प्रक्रिया २०२४च्या अखेरीस राबविण्यात आलेली आहे . यावेळी पहिल्यांदाच मनुष्यबळ पुरवठा व यंत्रसामुग्री पुरवठा याप्रमाणे सरसकट एकरकमी निविदा न मागविता, दैनंदिन रस्ते सफाई आणि उघडी गटारे सफाई प्रति किलोमीटर याप्रमाणे तर बंदिस्त गटारावरील चेंबर्स प्रती चेंबरनुसार साफ करणे आणि वर्गीकृत व विलगीकृत कचरा संकलन करून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी प्रतिटन याप्रमाणे निविदा मागविण्यात आली होती. सन २०२५-२६, २०२६-२७, आणि २०२७-२८ या तीन वर्षाकरिता राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये मे. दिनेश बी संख्ये , मे. हेना इंटरप्राइजेस, मे. नितीन बनसोड, रिलायबल एजन्सीज, मे. साई गणेश इंटरप्राईजेस, शिवम इंटरप्राईजेस, श्री अनंत इंटरप्राईजेस आणि मे. उजाला लेबर कॉन्ट्रॅक्टर हे कंत्राटदार महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने छाननी करून पात्र ठरवले होते. कंत्राटदारांनी काम करण्यासाठी दिलेले दर महानगरपालिकेला मान्य नव्हते. त्यामुळे कंत्राटदार, महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेने नेमलेल्या तांत्रिक सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्युशस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये कंत्राटासाठी वाटाघाटी करिता बैठका घेण्यात आल्या.परंतु या बैठकांमध्ये योग्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द केली.


महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती देण्यात न आल्यामुळे महानगरपालिकेने नवीन निविदा प्रक्रिया मे २०२५ पासून सुरू केली आहे. दरम्यान, किलोमीटर प्रमाणे रस्त्यांची सफाई, चेंबरची मोजदाद करून बंदिस्त गटारावरील चेंबर्सची सफाई, ओपन गटारांची किलोमीटर नुसार सफाई आणि आणि प्रतिटन प्रमाणे कचऱ्याचे संकलन व वाहतूक याप्रमाणे महापालिकेच्या निविदेतील अटी व शर्ती मान्य न करता, जशा पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाचे काम केल्या जात आहे.


त्याच पद्धतीने काम करण्याची तयारी पहिल्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी वाटाघाटी दरम्यान दाखवली. मात्र कंत्राटदारांना अशा पद्धतीने काम दिल्यास, महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचणार तसेच भविष्यात लेखापरीक्षण महालेखा परीक्षक यांचेकडून लेखा आक्षेप उपस्थित होतील ही शक्यता गृहीत धरून पालिकेने पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द केली. आणि नवीन निविदा प्रक्रिया मात्र पूर्वीप्रमाणेच ठोक पद्धतीने काम देण्याच्या स्वरूपाची राबविली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

Comments
Add Comment

रॅपिडो प्रवासात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, तरुणीच्या धैर्यामुळे अनर्थ टळला

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेतील सिंधी गेट परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय

भारत - दक्षिण आफ्रिकेचा आज धर्मशालात महामुकाबला

मालिकेवरील वर्चस्वासाठी चुरस; १-१ बरोबरीमुळे महत्त्व मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२०

डोंबिवलीत रस्ता झाला गुलाबी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण : डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत

पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार

जुन्नर वनविभागात ६८ बिबटे पकडले

पुणे : जुन्नर वनविभागात बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १३