Sebi Raids: सेबीच्या इतिहासातील आणखी मोठी कारवाई! देशभरात ३०० कोटीहून मोठ्या 'Pump and Dump' घोटाळा संशयितांची चौकशी सुरू

प्रतिनिधी: ऑनलाईन शेअर बाजारात 'Buy Multibagger Stocks' अशा आकर्षक जाहिरातींबरोबरच अनैसर्गिकपणे बाजारातील किंमतीवर प्रभाव पाडणे, तसेच 'या शेअर्समध्ये गुंतवणूक करा ' अशाप्रकारे जाहिरातीतून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या अनेक बाजारातील व्यक्तीविरुद्ध सेबीने धाड सत्र सुरू केले आहे. सेबी (Security Exchange Board of India) कडून हे धाड सत्र तसेच त्यांच्या ठिकाणी 'सर्च ऑपरेशन' सुरू केल्याचे सेबीने आज जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


'याद्वारे हे स्पष्ट केले जाते की सेबीने जून २०२५ मध्ये पंप आणि डंपिंगच्या काही स्क्रिपच्या संदर्भात अनेक ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई केली आणि गुन्हेगारी पुरावे जप्त केले आहेत. या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे.' असे सेबीने पंप आणि डंपिंग घोटाळ्याच्या बाबतीत भाष्य केले आहे. भूलथापा देऊन सामान्य लोकांना विशिष्ट समभागात (Shares) मध्ये गुंतवणूक करा सांगून नंतर त्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर नफेखोरी करणारी टोळी बाजारात आहे. अशा व्यक्तीविरुद्ध सेबीने अहमदाबाद, मुंबई, पुणे, गुरूग्राम अशा विविध ठिकाणी १८ जूनला धाडी टाकल्या होत्या. आता सेबी या 'Pump and Dump' प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


या कारवाया करताना विशिष्ट १५ ते २० शेल कंपन्यांना सेबीने लक्ष केले आहे. ज्यामध्ये काही कंपन्यांच्या प्रवर्तकांनी (Promoters) स्वतःच्या शेअर्समध्ये वाढ करण्यासाठी आणि नंतर विक्रीस काढून नफेखोरी करण्यासाठी हा घोटाळा केला होता. त्यावर सेबीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी सेबीने कॉर्पोरेट फाईल्स, तसेच रबर स्टॅम्प व इतर सामग्री जप्त केली आहे. सुरुवातीला प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे हा ३०० कोटींचा घोटाळा होता मात्र नेमका मूल्यांकनाचा आकडा समोर आलेला नाही.


पंप आणि डंप घोटाळा म्हणजे नक्की काय?


प्रवर्तक (Promoter) बनावट कंपन्या तयार करतात आणि त्यांना मालकीचे व्यापारी म्हणून नोंदणीकृत करतात जे नंतर कंपनीचे समभाग खरेदी आणि विक्री करतील. भूतकाळात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे सेबीने स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांच्या प्रवर्तकांना त्यांच्या स्टॉकमध्ये फेरफार करण्यासाठी पकडले होते.


पंप अँड डंप योजनेत, घोटाळेबाजांशी संबंधित संस्था प्रथम स्टॉकची किंमत वाढवण्यासाठी स्वतःच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास सुरुवात करतात आणि एकदा किंमत लक्षणीय रीत्या वाढली की ते किरकोळ गुंतवणूक दारांचे लक्ष वेधून घेतात आणि नंतर हेराफेरी करणारे शेअर्स अल्पज्ञानी किरकोळ गुंतवणूकदारांना विकून नफा मिळवून स्टॉकमधून बाहेर पडतात. थोडक्यात कृत्रिम नफेखोरी करतात.


सेबी या प्रकरणी सेबी काही टेलिग्राम चॅनेल्सवर लक्ष ठेवून आहे. जिथे सेबी नोंदणीकृत नसलेल्या विश्लेषकांकडून या समभागांची जाहिरात केली जात आहे आणि हे टेलिग्राम गट देखील हेरफेर योजनेचा भाग आहेत का त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

जाणून घ्या कशी असेल ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची परेड ?

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य

मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत

मुंबईत रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची चाकू भोसकून हत्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर मालाड स्टेशनवर शनिवारी रात्री ३१ वर्षांच्या प्राध्यापक आलोक सिंह यांची चाकू

वीज वितरण क्षेत्राची कामगिरी राज्यभर सुधारली

राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षम मुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या

पूर्व उपनगरातील एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार

कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूल सचिन धानजी मुंबई : पूर्व उपनगरातील कुर्ला पश्चिम कल्पना

मुंबईच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

चर्चेतील कुठला नगरसेवक ठरणार सरस? मुंबई : मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार हे आता स्पष्ट झाल्याने मोठा पक्ष