पराजूचा दगडू घेऊन येत आहे एक नवी कोरी प्रेमकहाणी...

  80

प्रथमेश परबचा नवा सिनेमा...

मुंबई लोकलला नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जात. लोकलच्या प्रवासात अनेकजणांशी नव्याने ओळखी होतात,असंख्य किस्से घडतात आणि प्रेमकहाण्या देखील जुळतात.यावरच बेतलेला एक नवा कोरा सिनेमा 'मुंबई लोकल' आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विविध सिनेमांमध्ये अनेक प्रकारच्या लव्ह स्टोरीजमधील मुख्य नायक साकारणाऱ्या प्रथमेश परबची जोडी यावेळी आपल्याला ज्ञानदा रामतीर्थकरसोबत पाहायला मिळणार आहे.

७:१७ ला ती दिसायची...८:१८ ला हरवायची…आशिष सोबत उरायचं फक्त आठवणींचं स्टेशन! मुंबई लोकल – प्रेमाच टाइमटेबल 1 ऑगस्ट पासून जवळच्या चित्रपटगृहात! अश्या आशयाचा कॅप्शन देत चित्रपटाची नायिका ज्ञानदा रामतीर्थकरने ह्या सिनेमाचं पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केल आहे. आज तिचा वाढदिवस असून हे निमित्त साधत तिने ही खुशखबर तिच्या चाहत्यांना दिली आहे.१ऑगस्ट रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

मुंबई लोकल या सिनेमाचं दिग्दर्शन,कथालेखन,संवादलेखन अभिजीत यांनी केल असून हा सिनेमा बिग ब्रेन प्रोडक्शन प्रस्तुत आहे. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेनमेंटच्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी केली आहे.त्र्यंबक डागा हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत.वनिता खरात, अनिकेत केळकर, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप,स्मिता डोंगरे ,अभिजीत चव्हाण, संजय खापरे, संजय कुलकर्णी असे उत्तम कलाकार या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.योगेश कोळी यांनी चित्रपटाचं छायांकन केलं. चित्रपटाचे असोसिएट डिरेक्टर विनोद शिंदे असून डॉ.सुमित पाटील यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांनी चित्रपटातील गाणी केली असून चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी केलं आहे.समीर सप्तिसकर यांचं पार्श्वसंगीत सिनेमाला लाभलं असून राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शनची जबाबदारी पार पाडली आहे.

प्रथमेश परबला आपण याआधी बालक पालक , टाईमपास , टकटक यांसारख्या सिनेमांमधून तर ज्ञानदाला ठिपक्यांची रांगोळी, सख्या रे सारख्या मालिकांमधून पाहिलं आहे. सध्या तिची 'लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका स्टार पप्रवाहवर सुरु आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मुख्य नायिका म्हणून ज्ञानदाला प्रथमच आपण रुपेरी पडद्यावर पाहणार आहोत.
Comments
Add Comment

गोडवा आणि तिखटपणाची मेजवानी – ‘वडापाव’ चित्रपटाचा चविष्ट टीझर प्रदर्शित!

मुंबई : मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीत वडापावचं स्थान खास आहे . वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं. वडा जसा

२५० कोटींचा अलिशान बंगला तयार, रणबीर-आलिया लवकरच करणार गृहप्रवेश

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर अखेर तयार झाले आहे. गेल्या अनेक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

Parineeti Chopra Pregnancy News : गुडन्यूज!"आमचं छोटं युनिव्हर्स येतंय", चड्ढा कुटुंबात लवकरच छोटं पाहुणं...परिणीतीच्या पोस्टने इंस्टाग्राम हँग

बॉलीवूडमधील चर्चेत असलेल्या पॉवर कपलपैकी एक, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमदार राघव चड्ढा यांनी अखेर

महाराष्ट्रीय भाऊ'ची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री, सलमान खानने केली खास मराठमोळा 'पाहुणचार'

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन, ज्याला 'महाराष्ट्रीय भाऊ' म्हणून ओळखले जाते, त्या प्रणित मोरेने 'बिग बॉस 19'च्या

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती