कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार


मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. चक्क 12 वर्षाच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. संबंधित मुलाला ही बंदूक कचऱ्यात पडलेली आढळून आली. त्यानं ती उचलली आणि खेळण्याची समजून त्यानं ट्रिगर दाबताच हवेत गोळीबार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित मुलाची चौकशी करुन, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोडेड बंदूक कचऱ्यात फेकणारा कोण व्यक्ती असावा याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जाणार आहे.



दहिसर पोलिसांकडून कसून चौकशी


गोळीबाराची माहिती मिळतच घटनास्थळी दहिसर पोलिसांनी धाव घेत संंबंधित मुलाला चौकशीसाठी आणि बंदूक ताब्यात घेतली होती. ही बंदूक कचऱ्यामध्ये कशी आली, या मुलाला कचरामध्ये खरंचं बंदूक भेटली. की त्यानं कुठून आणली होती या सर्व संदर्भात सखोल चौकशी दहिसर पोलीस करत होते. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाला कचऱ्याच्या ढिगात एक लोडेड पिस्टल सापडले असल्याचे सांगितले.



दहिसर पोलिसांनी काय म्हटलं?


दहिसर पोलीस यांना माहिती मिळाली की,साईकृपा चाळीच्या पूर्वेकडील मैदानाजवळ,घटनपाडा नंबर 02, दहिसर (पूर्व)या ठिकाणी कचऱ्यामधे बेवारस स्थितीत एक पिस्टल आणि 04 राऊंड मिळून आले आहेत. अधिक चौकशी केली असता सदरचं पिस्टल हे त्या भागात राहणाऱ्या एका 12 वर्षाच्या मुलानं खेळत असताना पाहिलं. खेळण्यातील समजून त्याचेकडून चुकून 1 राऊंड फायर झाला आहे. सदर घटनेमधे कोणालाही इजा किंवा दुखापत झालेली नाही.


सदर घटनेबाबत बाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच पोलीस पुढील योग्यतो तपास करुन आरोपीचा शोध घेत आहोत. ती बंदूक कुणाची हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल.
Comments
Add Comment

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात