Gold Rate Today: सोन्याचे दर सराफा बाजारात Crash ! सोने घसरणीचा नवा निचांक

प्रतिनिधी: आज सोन्याचे दर अक्षरशः 'क्रॅश' झाले आहेत. सलग पाचव्या दिवशी सोन्याचा दरात ही झालेली मोठी घसरण म्हणावी लागेल. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ६० रूपयांनी घसरण झाली आहे. तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ५५ रुपयांनी घसरण झाली आहे. परिणामी सराफा बाजारात २४ कॅरेट प्रति ग्रॅम दर ९७४२ रूपये तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम दर ८९३० रूपये आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ४५ रूपयांनी घसरत ७३०७ रूपयांवर पोहोचली आहे. २४ कॅरेट प्रति तोळा किंमत ६०० रूपयांनी घसरल्याने ९७४२० रूपयावर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ५५० रूपयांनी घसरत ८९३०० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ४५० रूपयाने घसरत ७३०७० रुपयांवर पोहोचली आहे.

आज मुंबई, पुण्यासह अनेक प्रमुख शहरांत २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दर ९७४२ रुपये आहे. दिल्लीत मात्र दर प्रति ग्रॅम ९८५७ रूपये आहे दिल्ली, बडोदा, अहमदाबाद वगळता इतरत्र किंमत ९७४२ रूपये प्रति ग्रॅम कायम आहे. मुंबई पुण्यासह बहुतांश शहरात २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ८९३० रूपये तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७३६० रूपये आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा निर्देशांक १.६१% घसरला होता.  तर आंतरराष्ट्रीय बाजारातील गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये काल १.३६% घसरण झाली होती. सोन्याच्या दरात २७ जूनला चार आठवड्यातील सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. स्पॉट गोल्ड (Spot Gold) निर्देशांकात काल १% घसरण झाली होती ज्यामुळे दर ३२९३ डॉलर प्रति औंसवर गेले होते, जे २ जूननंतर सर्वाधिक घसरलेले दर आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या निर्देशांकात २% घसरण झाली आहे. ही मोठी घसरण मानली जाते.

काल सोने सातत्याने घसरले?

इस्त्राईल व इराण यांच्यातील युद्धाविराम करून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती. ज्याचा मोठा फायदा अमेरिकन बाजारातील परिस्थितीवर झाला. पर्यायाने त्याचा फायदा भारतीय व आशियाई बाजारात झाला होता. मध्यपूर्वे कडील युद्धविरामानंतर सोन्याच्या मागणीतही मोठी घट झाली होती. संकटाची परिस्थिती नसल्यामुळे सोन्याच्या पुरवठ्यात कुठलीही अडचण नव्हती. उलट यापूर्वी मागणीतही वाढ झाली असताना लोकांनी सोन्याऐवजी चांदीकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु युद्धविराम झाल्यानंतर सोन्यातील दराप्रमाणे चांदी व कच्च्या तेलाच्या दरातही घसरण झाली. कच्च्या तेलाच्या निर्देशांकात झालेल्या घसरणीमुळे व डॉलर घसरल्यानंतर त्याची काही प्रमाणात झळ सोन्यालाही बसली आहे.

याशिवाय अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात इतक्यात कपात शक्य नसल्याचे जाहीर झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा ओघ इतर राष्ट्रांतील गुंतवणूकीकडे आहे. अशाच परिस्थितीत गुंतवणूकदार अमेरिकेतील पीसीई निर्देशांकात घातल्या ने सोन्याकडे दुर्लक्ष झाले आहे.आगामी काळात पीसीई आकडेवारीनंतर बाजाराची पुढील दिशा कळणार आहे. या आठवड्यात फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी काँग्रेससमोर हजेरी लावल्यानंतर हे घडले आहे. त्यांनी व्याजदरात लवकर कपात करण्याविरुद्ध इशारा दिला होता तसेच जकातींमुळे होणारी महागाई सुरुवातीच्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकू शकते असा इशारा दिला होता.

ट्रम्प यांनी पॉवेलवर कडक टीका करत म्हटले की त्यांच्या जागी 'तीन किंवा चार लोक' विचाराधीन आहेत. अहवालात म्हटले आहे की, ट्रम्प सप्टेंबरमध्ये पॉवेलच्या जागी नवीन व्यक्तीची निवड करू शकतात. आजचा सोन्याचा दर ९४४२० रू पयांच्या निचांकी पातळीवर गेला आहे.  शुक्रवारी ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अनालिसिसच्या आर्थिक आकडेवारीवरून असे दिसून आले की मे महिन्यातील वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure PCE) निर्देशांक, फेडरल रिझर्व्हचा पसंतीचा महागाई मापन, दरवर्षी २.३% वाढला,  जो एप्रिलच्या २.१% पेक्षा जास्त होता जो अंदाजानुसार होता कोर पीसीई जो अस्थिर अन्न आणि ऊर्जेच्या २.५% वरून २.७% वर पोहोचला आणि २.६% एकमत अंदाज ओ लांडला गेला होता.
Comments
Add Comment

Gold Silver Rate: US Fed व्याजदर कपातीचा सोन्या चांदीवर परिणाम सोन्यात सलग दुसऱ्यांदा घसरण चांदीतही घसरण कायम

मोहित सोमण:युएस फेड निकालापूर्वी सोन्यात अनेक स्थित्यंतरे आली. मोठ्या प्रमाणात सोन्यात हालचाली झाल्या. काही

Breaking News: सात ते आठ दिवसात भारत युएस टॅरिफ वादावर गोड बातमी मिळणार?

मुख्य आर्थिक सल्लागारांच्या विधानाने उद्योग विश्वात नवी चर्चा प्रतिनिधी:भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही.

Euro Pratik Sales IPO ला थंड प्रतिसाद शेवटच्या दिवशी मंद वेगाने सबस्क्रिप्शन मिळाले

प्रतिनिधी: युरो प्रतिक (Euro Pratik Sales Limited) कंपनीच्या आयपीओचा आज अखेरचा दिवस होता. कंपनीला शेवटच्या दिवशी एकूण १.२३ पटीने

IValue Info Solutions Limited कंपनीचा IPO आजपासून बाजारात दाखल पहिल्या दिवशी कंपनीला किरकोळ प्रतिसाद 'या' सबस्क्रिप्शनसह

प्रतिनिधी:आजपासून आयव्हॅल्यु इन्फो सोल्युशन्स लिमिटेड (Ivalue Info Solutions Limited) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला

प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: 'दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम' हीच उपमा आयटी शेअर्सच्या तेजीने केली सिद्ध शेअर बाजारात वाढ कायम !

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीने झालेली आहे. दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम !

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा