Woman Kirtankar Murder: महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या, संभाजीनगर हादरले

संभाजीनगर: वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकाराची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Woman Kirtankar Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.


ह. भ. प. संगीताताई महाराज (Sangitatai Maharaj) असं हत्या झालेल्या कीर्तनकार महिलेचं नाव आहे. त्या वैजापूर इथं एका आश्रमात राहत होत्या. २७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने आश्रमात घुसून त्यांची हत्या केली. आरोपीनं अमानुषपणे त्यांच्या डोक्यावर दगडाने अनेक प्रहार केले. हे वार इतके गंभीर होते की, या हल्ल्यात संगिताताई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात १२ आरोपींचा सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : देवरुख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण व लूट प्रकरणात एकूण १२

जयपूर-अजमेर महामार्गावर २ तासांत २०० सिलिंडरचा स्फोट

केमिकल टँकर आणि लीपीजी ट्रकमध्ये धडक, एकाचा मृत्यू जयपूर (वृत्तसंस्था) : मंगळवारी रात्री १० वाजता जयपूर-अजमेर

टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा नियमावलीच्या छताखाली

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ॲप आधारित वाहतूक सेवेबाबतचे धोरण येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार असून या