मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकरिता जिल्हाशः पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज केली.या सदस्यांना  ७ जुलै २०२५  पर्यत भाजपा मुंबईं कार्यालयात अहवाल सादर करावा लागणार आहे.आढावा घेण्यासाठी उतर मुंबई जिल्हाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम जिल्ह्याचा आढावा आमदार अमीत साटम आणि आ .विद्या ठाकूर घेणार आहेत.


उत्तर पुर्व जिल्हाचा आढावा आ.मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक हे दोघे घेणार असून उत्तर मध्य जिल्ह्याची जबाबदारी आ.पराग अळवणी आणि आ.संजय उपाध्याय यांच्याकडे देण्यात आली आहे. दक्षिण मध्य जिल्ह्याचा आढावा आ.प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनिल राणे तर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
दरम्यान, आज निवडणूक संचलन समितीची ही घोषणा करण्यात आली असून एकुण २७ सदस्यांच्या या समितीमध्ये मुंबईतील आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आणि महिला, युवा मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

Chandrakant-dada Patil : पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विद्यार्थीहिताच्या निर्णय

मुंबई  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील(Chandrakant Patil) यांनी विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत

Pandharpur Wari : आषाढी वारीसाठी मानाच्या १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान

मुंबई : आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या १ हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार

Sakinaka Manhole Accident : साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी चार अधिकाऱ्यांचे निलंबन

- विधानसभेत नगरविकास राज्यमंत्र्यांचे निवेदन; मृताच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, उच्च स्तरीय समिती

Dattatray Bharne : महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

विशेष सवलतींची तरतूद; शेतमजूर, निराधार महिलांना मिळणार शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यांमधील बदलांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

राज्य माहिती आयोगाला पत्र; अण्णा हजारेंनी दिला होता उपोषणाचा इशारा मुंबई : माहिती अधिकार (

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्ग

सार्वजनिक वाहतूक दिवसानिमित्त अ‍ॅक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी बीकेसी मध्ये मोफत फीडर बस सेवा मुंबई: मुंबई