मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकरिता जिल्हाशः पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज केली.या सदस्यांना  ७ जुलै २०२५  पर्यत भाजपा मुंबईं कार्यालयात अहवाल सादर करावा लागणार आहे.आढावा घेण्यासाठी उतर मुंबई जिल्हाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम जिल्ह्याचा आढावा आमदार अमीत साटम आणि आ .विद्या ठाकूर घेणार आहेत.


उत्तर पुर्व जिल्हाचा आढावा आ.मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक हे दोघे घेणार असून उत्तर मध्य जिल्ह्याची जबाबदारी आ.पराग अळवणी आणि आ.संजय उपाध्याय यांच्याकडे देण्यात आली आहे. दक्षिण मध्य जिल्ह्याचा आढावा आ.प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनिल राणे तर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
दरम्यान, आज निवडणूक संचलन समितीची ही घोषणा करण्यात आली असून एकुण २७ सदस्यांच्या या समितीमध्ये मुंबईतील आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आणि महिला, युवा मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती