BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार आहे. शहराच्या विकासाला आकार देणे हा त्यामागचा उद्देश आहे.  इमारतींच्या विकासाठी नागरिकांकडून सुचना आणि हरकती मागवण्यात आले आहेत. २०३४ पर्यंत शहाराच्या विकासाला नवीन आकार देण्यासाठी आत्याधुनिक सुविधांचा देखील वापर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


नवीन धोरणानुसार इमारतीचा पुनर्बांधणीचा विचार करुनच सौंदर्य बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यात महापालिका आयुक्त आणि वस्तुकला, दृश्य कला आणि संबंधिक क्षेत्रातील सहा सदस्यांचा समावेश असणार आहे.तसेच समावेश असलेल्या व्यक्तींचे छाननी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या नवीन धोरणानुसार प्रतिष्ठित इमारतीचा ५० टक्के भाग खुला राहिला पाहिजे. असे नवीन धोरणात नमूद करण्यात येणार आहे.


दरम्यान, या नवीन धोरणामध्ये निवासी इमारतींना सामान्यतः या श्रेणीतून वगळण्यात येणार आहे. यात केवळ अद्वितीय वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या धोरणाचा उद्देश मुंबईच्या विविध स्थापत्य वारशाचे प्रतिबिंबित करणाऱ्या रचनांना प्रोत्साहन देणे हा आहे. ज्यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक, आर्ट डेको आणि इंडो-सारसेनिक शैलींचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन  धोरणाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.






Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती