विजय देवरकोंडावर होणार पोलीस कारवाई ?

 

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आता मात्र हा अभिनेत्याचं नाव वेगळ्याच कारणासाठी वायरल होत आहे.त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे कारणही तसच खास आहे.

अभिनेता विजय देवरकोंडाने आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्थ विधान केले आहे. आदिवासी समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी २६ जून रोजी सिरोंचा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आदिवासी समाजाबद्दल हे वादग्रस्त विधान करून त्याने त्यांच्या भावना दुखावल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. एप्रिलमधील पहलगाम हल्ल्यानंतर त्याने आदिवासी समाजाबद्दल वक्तव्य केलं.

सिरोंचा पोलीस ठाण्यात जाऊन तेथील नगरसेवक सतीश भोगे यांनी तक्रार नोंदवून अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अस्ट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. तक्रार करताना रवी सुलतान,शंकर बंदेला, सुरेश गादाम उपस्तिथ होते.

"तक्रार आली आहे, याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे.या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने काय कारवाई करायची हा निर्णय वरिष्ठांना विचारून घेण्यात येईल."असं सिरोंचा ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी म्हटल आहे.
Comments
Add Comment

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा' आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर

बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

नोरा फतेही आणि संजय दत्तसह ५ जणांना महिला आयोगाचे समन्स

- 'सरके चुनर तेरी सरके' गीतातील अश्लीलते संदर्भात कारवाई मुंबई : 'सरके चुनर तेरी सरके' या अश्लील गाण्यावरून निर्माण

संजनाच्या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का, लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात सूरज चव्हाणच्या घरी गुड न्यूज?

मुंबई: बिग बॉस मराठीचा पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो.

नोराच्या 'सरके चुनर'वर कंगना रणौत यांची परखड टीका; हे गाणे सर्व मर्यादा ओलांडत...

मुंबई: रॅपर बादशाहच्या 'तेत्तिरी' गाण्यानंतर आता नोरा फतेही आणि संजय दत्त यांचे 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे वादात

शोले आणि मुघल-ए-आझम पेक्षा १०० पट चांगला आहे 'धुरंधर २'

मुंबई : 'धुरंधर २' हा बहुचर्चित हिंदी चित्रपट गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित