कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे.  कुर्ला ते विमानतळ (Mumbai Airport) दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे.  संबंधित कामासाठी सर्वात लांब केबल आधारित पूलाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील वाकोल्यातील हा पूल सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा भाग आहे. या पुलामुळे कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने करता येणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.





दिवसेंदिवस मुंबईच्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.  या पुलाची रुंदी १०.५ ते १७.२ मीटर आहे.आणि तो दुहेरी वाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आला आहे. वांद्रे - कुर्ला संकुलातील (BKC)  वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एससीएलआर (SCLR)  प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत बीकेसी परिसरात कलिना ते कुर्ला असे दोन उड्डाणपूल आहे. यापूर्वी कलिना येथून विमानतळाच्या दिशेने जाताना पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाकोला जंक्शन येथे पुलाची उभारणी केली असून त्याचे काम पूर्ण झाले आहे.


एमएमआरडीने (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी या पुलाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुखर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला, एवढचं नाही तर हा पुल पावसाळ्यातच वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती दिली. तसेच हा पूल वाहतुकीची कोंडी सोडवणारा असणार आहे असा विश्वास मुर्खजी यांनी व्यक्त केला. केबल आधारित उभारण्यात आलेल्या पुलाची लांबी साधारणपणे ९० अंशाचे असून त्याची लांबी सुमारे १००० मीटर आहे. तीव्र वळणामुळेच केबलचा वापर करण्यात आला आहे. हेच या पुलाचे खास वैशिष्टय आहे. मीडियाच्या आवाहलानुसार अशा प्रकारचा केबल पुल पहिलाच आहे, या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.



 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर

मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री

मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात

मुंबई : देशातील सर्वात जटिल नागरी रस्ता बोगदा प्रकल्पांपैकी एक असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता

मुंबईतील घरांसाठी म्हाडा लॉटरी

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत

नगर पथ विक्रेता समिती' निवडणूक निकाल होणार जाहीर

मुंबई : नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च

महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना; २० कोटीची तरतूद

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य दिव्यांग