खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील काटकर पाडा येथे शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. एका मुलाला वाचवण्यात यश आले असून, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


बोईसरमधील काटकरी पाडा परिसरातील असलेल्या खाजगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यापैकी सूरज यादव (७), धीरज यादव (११) या दोन सख्ख्या भावांसह अंकित गुप्ता या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. तर एक ११ वर्षीय मुलगा पाण्याबाहेर निघण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून खड्ड्याने भरलेल्या पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी तीनही मुलांना मृत घोषित केल्याने शवविच्छेदनासाठी तीनही मृतदेह तारापूर येथे पाठविण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे