ठाणे शहरात १०४ खेळांची मैदाने, मात्र खेळायला जागाच नाही

हक्काच्या मैदानांसाठी न्यायालयात दाद मागण्याचा सामाजिक संस्थांचा इशारा


ठाणे : ठाण्यात क्रीडा संस्कृती रुजावी, क्रीडापटू तयार व्हावेत या उद्देशाने शहरात १०४ खेळांची मैदाने होती. मात्र काळाच्या ओघात अतिक्रमण आणि व्यापारीकरणामुळे खेळण्यासाठी मैदानेच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करीत ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनने मैदाने वाचवण्यासाठी दंड थोपटले असुन न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.


पुर्वी तलावांचे शहर असलेल्या ठाण्यात मुबलक मैदाने होती, मात्र, आता सेंट्रल मैदान, साकेत मैदान,पोलीस परेड ग्राऊंड, गावदेवी मैदान अशी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मैदाने शिल्लक आहेत. पूर्वी ठाण्याच्या मैदानामध्ये सर्कशी तसेच मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. आता मैदानामध्ये अन्य बिनकामाच्या विकासकामांची भाऊगर्दी दिसत आहे. शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगच्या नावाखाली काही मैदानांचे लचके तोडले आहेत.


ठाणे महापालिका क्षेत्रात १०४ मैदाने आरक्षित आहेत. परंतु ही मैदाने विकासकांच्या घशात गेली आहेत. अनेक मैदानांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झालेले आहे. देखभालीचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करून ठाणे महापालिकेने काही मैदाने खाजगी व्यावसायिक, संस्थांना दिली आहेत. त्यांच्याकडून लग्न, पार्ट्या, मोठ्या समारंभासाठी मैदाने भाड्याने दिली जातात, खेळाचा उद्देश बाजूला पडुन मोठा नफा कमावला जात आहे. तेव्हा, ठाण्यातील नागरिकांच्या हक्काची मैदाने वाचवण्यासाठी ठाणे सिटिझन्स फाउंडेशनने दंड थोपटले आहेत. २०१४ पासून त्यांचा विविध स्तरावर लढा सुरू आहे. ठाणे महापालिका ते थेट क्रीडामंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत साकडे घातले.


एकीकडे ठाणे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास येत असताना दुसरीकडे मैदानाविना ठाणेकरांचे आरोग्य संकटात सापडले आहे. क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक वसाहतीनजीक मैदाने असावीत. पण अनेक खेळाच्या जागा ठाणे महापालिकेच्या ताब्यातच नाहीत. या मूलभूत सुविधेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
- कॅस्बर ऑगस्टीन, अध्यक्ष, ठाणे सिटिझन्स फाऊडेशन

Comments
Add Comment

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना