रश्मिकाच्या या लूकने प्रेक्षक घाबरले; श्रीवल्लीचा उग्र अवतार पाहिला का ?

अभिनेत्री रश्मिका मंदाना कायमच निरनिराळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येऊन त्यांची मन जिंकते. नॅशनल क्रश असणारी रश्मिका मंदाना तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. तिचा चाहतावर्ग करोडोंमध्ये आहे.गीता गोविंदम, पुष्पा सारख्या चित्रपटांतून तिने आपली वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे.आता मात्र तिच्या नव्या येणाऱ्या सिनेमाच्या पोस्टरमुळे ती भलतीच चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी पुष्पा सिनेमातील नाजूक श्रीवल्ली आता मात्र उग्र रूपात दिसत आहे.त्यामुळे प्रेक्षकांना धडकी भरली आहे.

काही वेळापूर्वी रश्मीकाने तिच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला त्यावर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. रश्मिकाच्या या नव्या सिनेमाच नाव 'मयसा' असून या पोस्टरमधून तिचा या चित्रपटातील लूक पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला आहे. रक्तबंबाळ चेहरा, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, डोळ्यात अंगार आणि हातात शस्त्र असा काहीसा रश्मिकाचा लूक आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत असून तिचे हात आणि चेहरा संपूर्ण रक्ताने माखलेला आहे. एखाद्या रणरागिणीसारखे तिचे केस मोकळे असून तिच्या अंगावर चांदीचे दागिने आहेत.



हे पोस्टर शेअर करताना रश्मिका कॅप्शन मध्ये म्हणते की,'मी नेहमीच तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते.काहीतरी वेगळ.काहीतरी रोमांचक आणि ही भूमिका त्यापैकीच एक आहे. हे मी कधीही साकारलेले एक पात्र आहे. मी असं पात्र याआधी कधीही साकारलं नव्हत. माझ्यातलं हे रूप ज्याला मी आतापर्यंत भेटले नव्हते ..हे भयंकर आहे..हे तीव्र आहे ..मी खूप घाबरली आहे आणि खूप उत्साहित पण आहे. आपण जी निर्मिती केली आहे ती पाहण्यासाठी मला अजून धीर धरवत नाही.ही सुरुवात आहे.

रश्मिकाने व्हायच्या अवघ्या २९ वर्षात सिनेमाविश्वात आपलं दमदार करिअर बनवलं. टॉलिवूडमधून सिनेमात रश्मिकाने पदार्पण केल आणि नंतर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांतून तिने तिची वेगळी छाप पाडली.रश्मिकाचा कुबेर हा सिनेमा सध्या सिनेमगृहात सुपरहिट ठरत आहे. पाच दिवसात तब्बल १०० कोटींची कमाई ह्या चित्रपटाने केली आहे. रश्मिकाचा कुबेर हा सिनेमा सध्या सिनेमगृहात सुपरहिट ठरत आहे. पाच दिवसात तब्बल १०० कोटींची कमाई ह्या चित्रपटाने केली आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही मात्र रश्मिकाच्या चाहत्यांमद्धे तिच्या या नव्या चित्रपटासाठी प्रचंड उसतुकता दिसत आहे.

 

 
Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी