Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम


मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहेत. दरम्यान, ३० जून २०२५ आधी आमच्या मागण्या मान्य झाल्यास १ जुलैपासून अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. या संपामध्ये शालेय बस चालकही सहभागी होणार असल्याने पालकांना स्वत: त्यांच्या मुलांना शाळेत सोडवायला आणि शाळेतून घरी आणायला जावे लागण्याची शक्यता आहे.




स्कुल बसेससह खाजगी वाहतुकदारांचा समावेश


सरकारने ३० जून २०२५ नंतर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतील विविध प्रवासी वाहतूक संघटनांनी अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुंबई बस मालक संघटनेचे मुराद नाईक म्हणाले. या संपात सर्व प्रकारच्या बसेस, ज्यामध्ये स्कूल बससह, उबर सारख्या अ‍ॅग्रीगेटर बसेस आणि खाजगी वाहतुकदारांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ई-चलन दंड वसूल करणे थांबवणे, विद्यमान दंड माफ करणे, जड वाहनांसाठी अनिवार्य स्वच्छता नियम रद्द करणे आणि महानगरांमध्ये प्रवेश बंदीच्या वेळेचा पुनर्विचार करणे,अशा बस चालकांच्या मागण्या आहे. बस चालकांनी केलेल्या या मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात शालेय बस धावतात. अनेक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची व्यवस्था करतात. तसेच काही खासगी वाहतूक कंपन्या देखील ही सेवा पुरवतात. अशा परिस्थिती बस चालकांनी संप पुकारल्यास पालकांनाच आपल्या मुलांना शाळेत सोडवायला तसेच शाळेतून घरी आणायला जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

उबाठा सोडून शिवसेना,भाजपात गेलेल्या कुणी मिळवली विजयश्री

उबाठात राहूनही ९ जणांची उमेदवारी नाकारली, ९ जणांचा पराभव मुंबई (सचिन धानजी) : शिवसेनेत जुलै २०२२ रोजी मोठा राजकीय

सीईटी नोंदणीत ‘आधार’चा अडथळा

नावातील विसंगतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

मुंबई : भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा

अंधेरीत सोसायटीवर गोळीबार, आरोपी फरार; गुन्हा दाखल, तपास सुरू

मुंबई : अंधेरीत लोखंडवाला बॅक रोड परिसरात एका सोसायटीच्या दिशेने अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे

मुंबई महापालिकेत यंदाही महापौरांविना झेंडावंदन

महापौरांची निवड काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक संपन्न होवून मतदारांनी

प्रजासत्ताक दिनी मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ सेवेत येणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर रखडलेले मेट्रो प्रकल्प पुन्हा मार्गी लागले असून, मंडाळे ते