MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या...


मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील सुमारे १९ वाहने अचानक थांबली. दोसीगावच्या पेट्रोल पंपावरून सर्व वाहने डिझेलने भरण्यात आली होती. मात्र या डझेलमध्ये भेसळीच्या संशयामुळे पेट्रोल पंपही सील करण्यात आलेलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया…



पेट्रोल पंप सील


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यासाठी इंदूरहून रतलामला १९ इनोव्हा कार मागविण्यात आल्या होत्या. शुक्रवारी रतलाममध्ये रीजनल कॉन्क्लेवचे आयोजन करण्यात आले आहे. याला यादव यायचे होते. म्हणून गुरुवारी रात्री या १९ इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलिअमच्या पेट्रोल पंपावर पाठविण्यात आल्या. डिझेल भरून या कार परत येत होत्या. तितक्यातचं एकेक करून कार बंद पडायला लागली. यामुळे धावपळ उडाली. चालकांच्या इंधनात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रशासनाला कळविल्यावर गोंधळ उडाला. या कार शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणार होत्या. पण त्या आदल्या रात्रीच सगळ्या बंद पडल्या. त्यानंतर प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या तपासादरम्यान पोलिसांनाही एक धक्कादायक प्रकरण दिसण्यात आले. डिझेलमध्ये पाण्याची भेसळ आढळून आली आहे. या पाण्यात मिसळलेल्या डिझेलमुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचे इंजिन निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाई करत पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. थे पेट्रोल पंप व्यवस्थापकाने पावसात पाणी गळती झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सविस्तर चौकशीनंतर हे प्रकरण स्पष्ट होईल.





या प्रकरणात नायब तहसीलदार आशिष उपाध्याय म्हणाले की, पावसामुळे पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती होण्याची शक्यता आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने पेट्रोल पंप सील केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल. आता या वाहन चालकांना त्यांचे इंजिन साफ करून घ्यावे लागणार आहे. याचा खर्च आता पेट्रोल पंपचालक देतो की वाहनचालकांनाच नाहक भुर्दंड पडतो, हे पहावे लागणार आहे. प्रशासनाने रातोरात पुन्हा इंदूरहून कार मागविल्या आहेत. या १९ इनोव्हा कारमध्ये प्रत्येकी २० लीटर डिझेल भरण्यात आले होते. त्यात १० लीटर पाणीच सापडले आहे. एका ट्रक चालकानेही या पंपावर २०० लीटर डिझेल भरले होते, तो देखील काही अंतरावर जाऊन बंद पडला आहे.



आज होणार प्रादेशिक परिषद


मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या उपस्थितीत आज (२७ जुलै) रतलाम येथे प्रादेशिक उद्योग, कौशल्य आणि रोजगार परिषद २०२५ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी गुरुवारी रात्री इंदूरहून १९ वाहने मागवण्यात आली होती. रतलाममधील दोसीगाव येथील पेट्रोल पंपावरून या वाहनांमध्ये डिझेल भरले जात असताना, थोड्या अंतरावर पोहोचल्यानंतर, एक-एक करून सर्व वाहने थांबली, ज्यामुळे प्रशासनाला धक्का बसला. प्रशासन रात्री पेट्रोल पंपावर पोहोचले आणि तपासणी केली आणि पेट्रोल पंप सील केला. रात्री अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पेट्रोल पंप सील करण्यात आला. त्यानंतर इंदूरहून इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली.

Comments
Add Comment

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर