Birla Group App: आदित्य बिर्ला कॅपिटल कंपनीचे ॲप हॅक ! सायबर घोटाळेबाजांनी चोरले १.९५ कोटींचे डिजिटल गोल्ड!

प्रतिनिधी: आदित्य बिर्ला समुहाची कंपनी एबीसीडी (Aditya Birla Capital Digital ABCD) कंपनीने आपले वित्तीय सेवा देणारे ॲप एप्रिल २०२४ मध्ये चालू केले होते. त्याच ॲपची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे ॲप (App) सायबर घोटाळेबाजांनी हॅक केले आहे.त्यामुळे या डिजिटल गोल्डमधील ४३५ खात्यातील १.९५ कोटी लंपास केले आहेत. कंपनीच्या स्थापनेनंतरची हा सर्वांत मोठी मानली जात आहे. ९ जूनला प्रथम घोटाळा उघडकीस आला होता. काही ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधला असता पुढील प्रकार लक्षात आलेला आहे.


माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांत कंपनीने तक्रार नोंदवली आहे. कंपनीने यानंतर कथित प्रकरणात नुकसान भरपाई देत ग्राहकांची खाती पुन्हा पुर्ववत केली आहेत. या डिजिटल ॲपमधून ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक वित्तीय सेवा व गुंतवणूक सेवा पुरविली जाते. युपीआय पेमेंट, म्युचल फंड गुंतवणूक, कर्ज, विमा अशा विविध सुविधांचा यात समावेश असतो. मात्र या घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंतेची लाट पसरली होती.ग्राहक प्लॅटफॉर्मद्वारे देखील डिजिटल सोने विकू शक तात.


याबाबतची तक्रार दाखल केली असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ग्राहकांनी हेल्पलाइनवर फोन करून त्यांच्या खात्यातून डिजिटल सोन्याची विक्री करण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की कंपनीच्या तांत्रिक टीमला असे आढळून आले की एका अज्ञात व्यक्तीने प्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हॅक केला आहे, ॲपची सामान्य प्रक्रिया बदलली आहे, ग्राहकांच्या खात्यांमधून डिजिटल सोने विकले आहे आणि पैसे त्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले आहेत.


कंपनीने तक्रार दाखल केली करण्यापूर्वी कंपनीने केलेल्या समिक्षेनुसार, ४३५ खात्यातील डिजिटल गोल्डची फेरफार झाली. त्यामुळे १.९५ कोटीचे नुकसान कंपनीच्या ग्राहकांचे झाले होते. त्यानंतर लगेचच प्रभावित ग्राहकांचे डिजिटल सोने पुनर्संचयित करण्यात आले असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे आणि अनेक बँक खात्यांमधील हस्तांतरण गोठवण्यासाठी सुधारात्मक कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की हॅकशी संबंधित तांत्रिक कमकुवतपणा दूर करण्यात आला आहे.


माहितीनुसार कंपनीच्या तक्रारीनंतर कलम ३१८(४), ३१९ (२) अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. याप्रकरणी अजून कुणालाही अटक झालेली नाही. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

व्हर्लपूल इंडियाचा शेअर ११% जबरदस्त कोसळला

मोहित सोमण:नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी व्हर्लपूल इंडियाचा शेअर आज मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. ११% पातळीवर

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

आज शेअर बाजारात 'नवा रेकॉर्ड' निफ्टीचा २६२८५.९५ नवा उच्चांक प्रस्थापित, काय गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

मोहित सोमण: आज सकाळी निफ्टी ५० निर्देशांकात नवा उच्चांक (All time High) प्रस्थापित झाला आहे. काल थोड्या अंकाने वंचित

गौरवशाली क्षण! युनेस्कोच्या मुख्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई: संविधान दिनानिमित्त पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्या

Stock Market Opening Bell: सकाळच्या शेअर बाजारात तेजीचा 'माहोल' कायम 'या' कारणामुळे सेन्सेक्स २८१.०५ व निफ्टी ८०.१५ अंकांने उसळला

मोहित सोमण:जागतिक मजबूत फंडामेंटल आर्थिक संकेतामुळे आज शेअर बाजारात वाढ अपेक्षित होती त्याअनुषंगाने इक्विटी