Pandharpur Wari 2025 : वारकऱ्यांची आरोग्यसेवा कोण करतं?

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. याच लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी एकादशी पंढरपूरमध्ये दाखल होतात. पण हे वारकरी १५ ते २० दिवस आधीच आपल्या घरातून पायी निघालेले असतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असते​. या काळात त्यांना अनेक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. वारी आरोग्य संपन्न ठरावी म्हणून शासन स्तरावर आरोग्य विभाग, सेवाभावी व विविध सामाजिक संस्थांकडून दिंडी मार्गावरआरोग्य सुविधा उपलब्ध करून ​दिल्या जातात. ​दिंडी आणि आरोग्यसेवा यांचा जवळचा संबंध आहे. ​त्यामुळं जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य समोर ठेवत आळंदी ते पंढरपूर पालखीमार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांची सेवा करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संघटनांनी विविध उपक्रम राबविले.​

?si=Dyz9UkmfK3e7kBy4

ऊन, वारा,पावसाची तमा न बाळगता विठूरायाचं नाम घेत वारकरी चालत असतात. त्यामुळं वारकऱ्यांचे पाय दुखतात.सर्दी,ताप,खोकला व अंगदुखीचा त्रास होतो. त्यामुळं यासाठी त्यांनाउपचाराची गरज असते. त्यामुळं वारी मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. यंदा वारी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर तात्पुरत्या आपला दवाखाना माध्यमातून माेफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाने दीड हजारांवर डाॅक्टर व कर्मचारी पुरवलेत. वारीच्या मार्गावर ४६ ठिकाणी १० खाटा तात्पुरत्या रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. अनेक दानशूर नागरिक व स्वयंसेवी संस्थाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा मोफत पुरवत आहेत. सलग ३३ ​वर्षांपासून मुंबई येथील माउली चॅरीटेबल अ‍ॅड मेडिकल ट्रस्ट ​वारकऱ्यांची आरोग्य सेवा करत आहे. यंदाही या ट्रस्टने आळंदीपासून निघालेल्या वारकरी बांधवांची ​मोफत आरोग्य तपासणी ​करून औषधांचे वाटप केले. वारीतील वारकरी बांधवांची तेल लावून मालीश केली जात आहे. या आरोग्य सेवेसाठी साडेचारशे डॉक्टर व सेवक सहभागी ​झालेले आहेेत. पंढरपूरपर्यंत त्यांची सेवा सुरू राहणार आहे.



​जगद्गुरू संत तुकाराम व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यां​ पुण्यात दाखल झाल्या. त्यावेळी पुणे महापालिकेतर्फे १६ फिरती वैद्यकीय पथके तैनात ​केली. या माध्यमातून ​ मोफत तपासणी आणि औषधोपचार​ केले. पुण्यात जवळपास पुण्यात ३०हजार वारकऱ्यांवर मोफत उपचार ​करण्यात आले. पालखीतळाच्या परिसरात १० ठिकाणी वैद्यकीय पथके व दवाखाने कार्यरत होते.
Comments
Add Comment

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई