पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

  56

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे


नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या जलवाहिनीत चाचणीनंतर हवेचा दाब निर्माण झाला. त्यामुळे ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालले नाही. अवघे २५ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा झाल्याने पंचवटीसह पूर्व विभागातील काठे गल्ली व परिसरात पाणीपुरवठा पाचव्या दिवशी विस्कळीत झाला आहे.


स्मार्ट सिटी कंपनीमार्फत गेल्या शनिवारी हाती घेण्यात आलेल्या जुने गंगापूर पंपिंग स्टेशन येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटे पूर्ण होत असतानाच निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्रावरील जलवाहिनीत हवेचा दाब निर्माण झाल्याने पंचवटीसह पूर्व विभागातील काठे गल्ली भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलशुद्धीकरण केंद्रे तसेच जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग व स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शनिवारी (दि.२१) शटडाउन घेण्यात आला होता. बारा बंगला ते निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला जोडणारी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जुन्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथे लिकेज झाल्याने दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काही तासांतच पुन्हा त्याच ठिकाणी ही जलवाहिनी लिकेज झाली. त्यामुळे शनिवार, रविवारपाठोपाठ सोमवारीदेखील सिडको व इंदिरानगरचा काही भाग वगळता उर्वरित शहरात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (दि. २४) पहाटेपर्यंत सुरू होते. परंतु, जलकुंभ भरण्यास विलंब झाल्याने सकाळचा पाणीपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंदच राहिला. अनेक भागांत पाणी न आल्याने टँकरची मागणी नोंदविली गेली. विशेष करून, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला. तीन तास उशिराने पाणी सोडण्यात आले.


जुने नाशिक भागात पाण्याची सर्वाधिक बोंब झाली. सिडको, इंदिरानगर भागात विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करण्यात आला.



नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या त्रासाबद्दल महापालिकेतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची