'त्या गे व्यक्तीने मला नको तिथे स्पर्श केला...', अभिषेक कुमारचा धक्कादायक अनुभव

मुंबई: 'बिग बॉस १७' मुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक कुमारने (Abhishek Kumar) नुकताच कास्टिंग काऊचचा एक धक्कादायक अनुभव (Casting Couch Experience) शेअर केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, मुंबईत करिअरच्या सुरुवातीलाच त्याला या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे तो इतका घाबरला की त्याने रडत रडत आपल्या आईला फोन केला.


अभिषेक म्हणाला, "एकदा माझ्यासोबत एक घटना घडली होती. एक गे (Gay) व्यक्ती होता... त्याने मला नको तिथे स्पर्श केला... मी खूप घाबरलो. 'तुला असे करावे लागेल, तरच तू पुढे जाशील...' असे तो बोलला होता. ही गोष्ट तेव्हाची आहे, ज्यावेळी मला मुंबईत येऊन दोन महिनेच झाले होते"


या घटनेनंतर अभिषेक इतका अस्वस्थ झाला होता की त्याने त्वरित आपल्या आईला फोन केला. त्यावेळी त्याने घरी सांगितले नव्हते की तो मुंबईत आहे; त्याने आईला दिल्लीत ट्रेनिंग करत असल्याचे सांगितले होते. अभिषेकने सांगितले, "मी माझ्या आईला रडत रडत म्हणआलो की, 'माझ्यासोबत असे झाले आहे...' माझ्या आईने मला घरी परत येण्यास सांगितले. मी पुढच्याच दिवशी ट्रेनच्या जनरल कोचचे तिकीट काढले. ट्रेनच्या जनरल कोचमध्ये बसून मी रडत रडत घरी चाललो होतो. त्यावेळी घरी गेलो होतो आणि स्वतःशीच म्हणत होतो की, मला या इंडस्ट्रीत यायचे नाही, इथे काम करणे अवघड आहे... मला इथे यायचेच नाही."


अभिषेक कुमारने 'उडारियां' शोमध्ये अमरीक सिंह विर्क आणि 'बेकाबू'मध्ये आदित्य रायचंद या भूमिका साकारल्या होत्या. या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. त्यानंतर तो 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झाला आणि उपविजेता ठरला. बिग बॉसच्या घरात ईशा मालवियासोबतच्या भांडणामुळे तो विशेष चर्चेत आला होता.

Comments
Add Comment

श्रद्धा कपूर साकारणार " लावणी सम्राज्ञी विठाबाई " यांची भूमिका !

मुंबई : दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. छत्रपती संभाजी महाराज

ए.आर. रहमान आणि मोहित चौहान राम चरणच्या पेड्डी मध्ये आणणार का संगीताचा तडका?

राम चरण स्टारर पेड्डी मध्ये ए.आर. रहमान आणि मोहित चौहान यांचा होणार धमाकेदार म्युझिक कोलॅबरेशन? भारतीय संगीत

क्षितिज पटवर्धन पहिल्यांदाच दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

आई - मुलाच्या गोष्टीत झळकणार लोकप्रिय कलाकार मुंबई : जन्माच्या आधीपासूनच आपल्या आईशी आपलं नातं जुळलेलं असत. आई

कायदेशीर नोटीसमुळे 'हक' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

मुंबई  : इमरान हाश्मी आणि यामी गौतमी यांचा आगामी चित्रपट ‘हक’ प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला

'नागिन ७' मध्ये दिसणार प्रियांका चहर चौधरी

मुंबई: अखेर एकता कपूरने, 'नागिन ७' या शोमध्ये यावेळी मुख्य भूमिकेत प्रियंका चहर चौधरी ही अभिनेत्री दिसणार आहे.

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांना मातृशोक

मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता पंकज त्रिपाठी याची आई हेमवंती देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ८९