क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव रुग्णालयात

नवी दिल्ली : भारताच्या टी २० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव जर्मनीतील रुग्णालयात आहे. सूर्यकुमार यादववर जर्मनीत यशस्वी स्पोर्ट्स हर्निया झाली.

बीसीसीआयने रोहित शर्मानंतर भारताच्या टी २० क्रिकेट संघाचे नेतृत्व ३४ वर्षांच्या सूर्यकुमार यादवकडे सोपवले. पण शस्त्रक्रियेमुळे सूर्यकुमार यादव बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. पूर्ण बरा होण्यासाठी सूर्यकुमारला किमान सहा ते बारा आठवडे लागतील.

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताच्या टी २० क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यानंतर भारत बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि टी २० मालिका खेळवली जाणार आहे. पहिला टी २० सामना २६ ऑगस्ट २०२५ रोजी तर शेवटचा टी २० सामना ३१ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.

सूर्यकुमार यादवची सोशल मीडिया पोस्ट

'लाइफ अपडेट, पोटाच्या खालच्या उजव्या भागात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, मी बरा होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.'



सूर्यकुमार यादवची कारकिर्द

सूर्यकुमार यादवने तिसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने एक कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ८३ टी २० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ७७३ धावा आणि टी २० मध्ये २५९८ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने टी २० मध्ये चार शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत. तो रुग्णालयात दाखल होण्याआधी मुंबई लीग २० या काही दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेत खेळला होता.
Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना