Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्याने परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. ई-चलनविषयक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारची भूमिका असून त्यासाठी परिवहन विभागाने संबंधित समिती स्थापन करावी आणि त्या समितीने एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा असे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. मंत्रालय विभागात प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी बैठक बोलवली.


या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) गृह विभाग संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ई-चलन प्रणालीत सुधारणा करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रताप सरनाईक म्हणाले ई- "चलन प्रणालीत सुधारणा करताना प्राधान्याने वाहनचालक व मालकांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणारे निकष असावे, त्यात कुठेही जाचक अटी लादू नये.


एकाच दिवशी एकसमान कारणासाठी वेगवेगळे चलन वसूल करू नये. त्यासाठी चलनाचा ग्राह्यता कालावधी निश्चित करावा, व्यावसायिक वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबईमध्ये जड वाहतूक वाहनांना प्राधान्याने वाहनतळ सुविधा उपलब्ध करून द्यावी. वाहतूक संघटनांच्या समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञांची सयुंक्त समिती स्थापन करावी, त्यामध्ये वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा." अशी माहिती सरनाईक यांनी दिली.


तसेच प्रताप सरनाईक पुढे म्हणाले  "समितीच्या कामात पारदर्शकता व सर्वसमावेशकता येईल. तसेच पोलीस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईत सध्याच्या ई-चलन निकषात शिथिलता आणावी. परिवहन विभागाच्या परित्रकाच्या निकषानुसार पोलिसांनीही आवश्यक तिथेच कार्यवाही करावी. चलनासोबत प्रत्यक्षस्थळाचे छायाचित्र अपलोड करावे, वास्तविक वेळेचे छायाचित्र घ्यावे. अनावश्यक, नाहक कारवाई करणे थांबवावे. संपूर्ण चलन प्रक्रिया ही सहिष्णू, पारदर्शक आणि सुव्यवस्थितरित्या राबवण्याच्या दृष्टीने समितीने अभ्यास करावा. ई-चलनाच्या जाचक निकषात योग्य बदल करावेत. वाहनांसाठीची गती मर्यादा, वाहनतळ नियमावली या सर्वांचा अभ्यास करून समितीने अहवाल सादर करावा. वाहतूक संघटनांच्या मागण्यांना न्याय देण्याची विभागाची भूमिका असल्याचे"  मंत्री सरनाईक यांनी सांगितले.


Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या