Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा प्रसारमाध्यमात बातम्या गेल्या काही दिवसांपासून झळकत होत्या. त्यामुळे दुचाकी वाहनचालक संभ्रमात पडलेले आहेत. मात्र केवळ या बातम्या अफवा असून दुचाकी चालकांकडून कोणत्याही प्रकारे टोल घेतला जाणार नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली.त्यामुळे दुचाकीस्वार करणाऱ्या वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे.





दुचाकीस्वारकडून दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार


एनएचएआयच्या नवीन माहितीनुसार दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर धावण्यासाठी टोल भरावा लागेल. ज्या दुचाकीस्वाराने टोल भरण्यास टाळाटाळ केली किंवा फास्टॅग वापरला नाही तर दुचाकीस्वारकडून दोन हजारांचा दंड आकरण्यात येईल, अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेले होते. अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असं नितीन गडकरी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.


मी माध्यमांचा निषेध करतो


नितीन गडकरी म्हणाले की, "काही माध्यमांद्वारे राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांकडून टोल वसूल केला जाणार आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत. परंतु, असा कोणताही निर्णय झाला नाही. दुचाकी वाहनांना टोल शुल्कातून सूट देण्यात आली. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. मी अशा माध्यमांचा निषेध करतो."


 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

एमपीसीबीचा ओसाखा सिटी प्रशासनासोबत सामंजस्य करार

मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) जपानच्या

लोकमान्य टिळक मंडईतील विक्रेत्यांवर कारवाई

नूतनीकरणावरून वाद तीव्र मुंबई : लोकमान्य टिळक मंडईमध्ये कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता वाढीव बांधकामावर

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी

गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त झाले

सत्र न्यायालयाचा एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना गंभीर इशारा मुंबई : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल

प्रशासनालाच पडला पालिका सभागृहाच्या निर्णयाचा विसर

नगरसेवकांची हजेरी बायामेट्रिक पद्धतीने सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पुस्तिकेवरील

प्रजासत्ताक दिनी राज्यपाल मुंबईत; उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ध्वजवंदन करणार!

मुख्यमंत्री फडणवीस दादरमध्ये, अजित पवार पुण्यात हजेरी लावणार मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री