राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार

  53

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर एक समिती स्थापन करून धोरण तयार करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंह यांच्यासह नगर विकास व गृह विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्यात वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांनी आपापल्या स्तरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असले तरी यामध्ये एकसंधपणा नसल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून, पोलीस विभागाच्या माध्यमातून सचिव पातळीवर समिती स्थापन करून सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचे धोरण मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले.


राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरत असून, त्यांचा वापर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे यापुढे सार्वजनिक सीसीटीव्ही सर्व ठिकाणी लावणे बंधनकारक करण्यासाठी नियोजन केले जात असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले.


नवीन धोरणानुसार कोणती यंत्रणा कोणत्या प्रकारचे सीसीटीव्ही बसवेल, त्यांचा देखभाल खर्च, फुटेज, यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून, ती संपूर्ण प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही कदम यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना