मनमाडकरांना लवकरच मिळणार रोज पाणी

करंजवण योजना पूर्ण; आ. कांदे यांच्याकडून पाहणी


मनमाड : चार दशकांपासून पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या मनमाड शहरासाठी वरदान ठरलेल्या करंजवण- मनमाड थेट जलवाहिनी पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी करंजवण योजनेच्या जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून हे काम पूर्णत्वास आले असून, शहराला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण


लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचे लोकार्पण होणार आहे.
मनमाडकरांना कित्येक दशकापासून होणारा त्रास लवकरच दूर होणार असून करंजवण पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वास गेली आहे. मायभगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवून मनमाडकरांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावून मला पुण्य मिळाले आहे. ही योजना मनमाडकरांच्या सार्थ पाठिंब्याने पूर्ण झाली आहे.
- सुहास कांदे, आमदार
Comments
Add Comment

वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी