Gold Silver: आज सोने चांदी 'जैसे थे ' मात्र चांदी महागण्याची शक्यता 'हे' आहे कारण!

प्रतिनिधी: आज सराफा बाजारात कोणतीही बदल झालेली नाही. 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा बाजारात किंमतीत 'थंडावा' दिसत आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, सकाळी सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमतीत कुठलाही बदल झालेला नसल्याने किंमत पातळी ९८९५ रूपयांवर स्थिरावली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत पातळीही बदलली नसल्याने पातळी ९०७० रूपयांवर स्थिरावली आहे.


१८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम किंमतही ' जैसे थे 'असल्यामुळे किंमत पातळी ७४२१ रूपये प्रति ग्रॅमवर कायम आहे. २४ कॅरेट सोन्याचे प्रति तोळा दरही ९८०५०, २२ कॅरेट प्रति तोळा किंमत ९०७००, १८ कॅरेट प्रति तोळा किंमत ५४२०१ रूपयांवर कायम आहे.आज मुंबई, पुण्यासह भारतातील प्रमुख शहरांत सोन्याचा सरासरी दर ९८९५ रूपयांवर कायम आहे.सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future Index) यामध्ये संध्याकाळप्रमाणेच ०.१८% किरकोळ वाढ झाली आहे. तर गोल्ड स्पॉट दरात (Gold Spot Index) यामध्ये ०.२% प्रति औंस घसरण झाली. तर पहाटे गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.२% घसरण झाली आहे.


फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला केला आहे. पॉवेल यांनी वेट अँड वॉचचा पवित्रा घेण्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केल्यानंतर पॉवेल यांना युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  'भयंकर' (Terrible) म्हटले आहे. याशिवाय युएस डॉलर निर्देशांकात आशियाई बाजारात ०.३% घसरण झाली होती.तथापि,ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल आणि इराणमध्ये झालेल्या युद्धबंदीमुळे वाढ मर्यादित राहिल्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली जी बुधवारपर्यंत टिकून राहिली. मात्र डॉलरच्या आशियाई बाजारातील घसरणीमुळे सोन्यातील दराला सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली होती. सोन्याच्या एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) निर्देशांकात ०.०६% घसरण झाल्याने कमोडिटी एक्सचेंजमधील सोन्याची पातळी ९७२९९.०० रुपयांवर पोहोचली आहे.


चांदीच्या दरातही जैसे थे!


चांदीच्या दरातही सोन्याच्या दराप्रमाणे कुठलीच वाढ झालेली नाही किंबहुना दर स्थिर राहिले आहेत. युएसने केलेल्या हस्तक्षेपामुळे मध्यपूर्वेकडील दबावाचा निचरा झाला होता मात्र सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर निर्देशांकात किंचित वाढ झाली आहे. चांदीच्या फ्युचर निर्देशांकात ०.६१% वाढ झाली आहे.याखेरीज बाजारात स्थिरता आल्यानंतर चांदीच्या दरात पुन्हा वाढ होऊ शकते असे प्रसारमाध्यमांनी कालच म्हटले होते. ही वाढ प्रामुख्याने चांदीच्या घटत्या पुरवठ्याबरोबरच वाढत्या मागणीमुळे होऊ शकते. यामुळे आगामी काळात चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सकाळी एमसीएक्स एक्सचेंजमधील चांदीच्या दरात ०.३९% वाढ झाल्याने दर पातळी १०६३९०.०० पातळीवर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक