मध्य रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये नऊ दिवसांत ३.१८ लाखांचा दंड वसूल

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देत, सोमवार, १६ जूनपासून अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि प्रथम श्रेणीच्या उपनगरीय प्रवाशांचा दर्जा राखण्यासाठी उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये केंद्रित तिकीट तपासणी मोहीम राबविली आहे.


प्रथम डब्यांमध्ये प्रवासाबाबत येणाऱ्या श्रेणीच्या अनधिकृत सातत्याने तक्रारींमुळे, मुंबई विभागातील तिकीट तपासणी पथके, आरपीएफ
कर्मचाऱ्यांसह गर्दीच्या वेळेत उपनगरीय लोकल गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये धोरणात्मकरित्या तैनात करण्यात आली. मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये ही तपासणी करण्यात आली.


प्रत्येक शिफ्टमध्ये सरासरी ४१ तिकीट तपासणी कर्मचारी आणि ७ आरपीएफ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाने १६ जून ते २४ जून पर्यंत १०३ उपनगरीय सेवांमध्ये तपासणी केली. यावेळी अनियमित प्रवासाची एकूण ९८४ प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून ३.१८ लाख रुपये वसूल करण्यात आले. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे ज्या गाड्यांची तपासणी केली जात होती त्या गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले, ज्यामुळे डब्यांमध्ये तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे निर्माण झालेला मजबूत प्रतिबंधात्मक परिणाम आणि तिकीट खिडकी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. तपासणी कालावधीत प्रथम श्रेणीमध्ये अनियमित प्रवासाशी संबंधित तक्रारींमध्येही लक्षणीय घट झाली.


यावेळी अनेक प्रथम श्रेणीतील प्रवाशांनी रेल्वेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अनेकांनी अनधिकृत प्रवाशांची ओळख पटवून देण्यात आणि दंड वसूल करण्यात तैनात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला.

Comments
Add Comment

स्मार्टफोनवर येणार ९ नवीन इमोजी

युनिकोड १८.० अपडेटमध्ये नव्या इमोजींचा समावेश आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो.

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक

मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण

मुंबईत ८७ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

मुंबई महापालिकेत पाचव्या क्रमाकांवर नोटाला मतदान मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक

महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरांच्या खुर्चीवर पिठासिन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा मुंबई : महापौरपदाचे आरक्षण