आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये वाढीव आरक्षण देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.  या बैठकीत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षण मंत्री दादा भुसे आदिवासी मंत्री अशोक उईके, इतर मागासवर्गिय आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे उपस्थित होते.





राज्यातील पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.या भागातील आदिवासींसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण वाढवण्याची गरज आहे. यासाठी सध्या ही बैठक घेण्यात आली आणि याबाबत सोशल मीडियावर स्वतः बावनकुळे यांनी पोस्ट करत सांगितले आहे. तसंच याबाबत प्रस्ताव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठवण्यात आला आहे. ही दुसरी बैठक झाल्याचेही सांगण्यात येत आहे.


आदिवासी समाजाला आरक्षण आणि इतर मागासवर्गीय, पारंपरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग,  यांचे आरक्षण काही प्रमाणात कमी करुन आदिवासी समाजाला ते आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती. राज्य सरकार मंत्रिमंडळ समितीची दुसरी बैठक झाली.


आदिवासी समाजाला आरक्षण देताना एसईबीसी आणि ओबीसी यांचे आरक्षण कमी करु नये असे  छगन भुजबळ यांनी सुचवले आहे. त्याच वेळी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही बैठकीत आपले विचार मांडले. सर्व सदस्यांच्या मतांचा विचार करून आता या विषयावरील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

.
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती