अभिनेता सलमान खान बनला दिल्ली फ्रँचायझीचा मालक

नवी दिल्ली : देशातील पहिली आणि सर्वात मोठी टेनिस बॉल टी-१० क्रिकेट लीग इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामापूर्वी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आता आयएसपीएल मधील नवी दिल्ली फ्रेंचायझीचे मालक असणार आहेत. ही नवी टीम आयएसपीएल मध्ये अशा वेळी सामील झाली आहे, जेव्हा या लीगने आपल्या दुसऱ्या हंगामात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आयएसपीएल हंगाम २ ने टीव्हीवर २.८ कोटींहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि पहिल्या सीझनच्या तुलनेत ४७ टक्के वाढ झाली. यामुळे आयएसपीएल मधील रोमांच वाढला आहे.


सलमान खानच्या सामील होण्यामुळे केवळ नवी दिल्ली संघच बळकट होणार नाही, तर संपूर्ण लीगला एक नवीन ओळख मिळणार आहे. आता तो अशा सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे आधीच इतर आयएसपीएल संघ आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन (माझी मुंबई), सैफ अली खान आणि करीना कपूर खान (टायगर्स ऑफ कोलकाता), अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), सूर्या (चेन्नई सिंघम्स), हृतिक रोशन (बंगलोर स्ट्रायकर्स) आणि राम चरण (फाल्कन रायझर्स हैदराबाद) अशी नावे आहेत. अभिनेता सलमान खान यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, क्रिकेट ही प्रत्येक भारतीय गल्लीची ओळख आहे. आणि जेव्हा हीच ऊर्जा स्टेडियमपर्यंत पोहोचते, तेव्हा आयएसपीएल सारख्या लीगचा जन्म होतो. मी कायमच क्रिकेटबद्दल अत्यंत उत्साही राहिलो आहे आणि आता आयएसपीएल सोबत जोडला गेल्याचा मला खूप आनंद आहे. ही लीग केवळ स्थानिक स्तरावरचा क्रिकेट पुढे नेत नाही, तर प्रतिभावान खेळाडूंना एक मजबूत आणि व्यापक मंच देखील उपलब्ध करून देते. ही तर फक्त सुरुवात आहे.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव