11th Admission: अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई (प्रतिनिधी) : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी हतबल झाले असताना आता पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर पडणार आहे. तीन वेळा लांबणीवर जाऊन अखेरीस २६ जून रोजी जाहीर होणे अपेक्षित असणारी पहिली गुणवत्ता यादी आता पुन्हा रखडली आहे. ही यादी जाहीर होण्यास आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पुरते कोलमडण्याची शक्यता असल्याने पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


अल्पसंख्याक कोट्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयानुसार संकेतस्थळामध्ये काही बदल करावे लागणार आहेत. हे बदल करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे २६ जून रोजी जाहीर करण्यात होणारी पहिली प्रवेश यादी आता पुन्हा चार ते पाच दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.


अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला दरवर्षी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता यंदा राज्य मंडळाने दहावीचे निकाल जवळपास १५ दिवस लवकर जाहीर केले. मात्र पहिल्या दिवसापासून निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे.


अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना नोंदणीच्या टप्प्यावरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. याच तांत्रिक अडचणीमुळे १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी ही २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले होते.


Comments
Add Comment

मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट! नेरूळ-उरण-बेलापूर पट्ट्यात अतिरिक्त लोकल सेवा लवकरच होणार सुरू

नवी मुंबई: नेरूळ उरण रेल्वेमार्गावर उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ व्हावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून मागणी

'शक्ती'नंतर राणीबागेत 'रूद्र' वाघाचा मृत्यू! प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न

मुंबई: मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एका वाघाच्या बाबतीत धक्कादायक घटना

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व