"आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली," आणीबाणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?

  71

मुंबई : आणीबाणीत संर्घष करणाऱ्याला स्मरणार्थ ५० वर्ष पूर्ण झालेले असून मुंबई येथे संविधान हत्या दिन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील आठवणी सांगताना भावूक होताना पाहायाला मिळाले. त्याकाळी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपविण्यात आले होते. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन त्याकाळी सर्वच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले होते. काही लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते. ज्यांची लग्न झालेली नव्हती, त्यांची कुटुंब नियोजनाची ऑपरेशन करण्यात आलेली होती. आणीबाणीच्या काळात अनेक कुटुंब उद्धवस्त करण्यात आली. आणीबाणीच्या काळात नेमकं काय चाललंय, तुम्हाला माहिती होऊ नये यासाठी वृत्तपत्रांवर निर्बंध आणले गेले.


भारताची लोकशाही जिवंत आहे... 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  "अलीकडे कुणीही उठतं आणि लोकशाहीबद्दल बोलत असतं. लोकशाहीची गळचेपी, लोकशाहीची हत्या केली जाते असं सांगितलं जातं. भारतातमध्ये कुठल्याही चौकात उभे राहून तुम्ही पंतप्रधानांना शिव्या देऊ शकता, तरीही तुमच्यावर कारवाई केली जात नाही, त्याच कारण म्हणजे आम्ही लोकशाही जिवंत ठेवली. कारण त्याकाळी आम्ही संघर्ष करुन लोकशाही टिकवली" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली...


आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी काय महत्वाची भूमिका पार पाडली याची आठवण करुन देताना मुख्यमंत्री म्हणाले, "आणिबाणीच्या काळात पाकिस्तानशी युद्ध झाले होते.  त्यावेळी जनसंघ म्हणून इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. आणीबाणी उठल्यानंतर रामलीला मैदानावर जंगी सभा झाली त्या सभेत इंदिरा गांधी मुर्दाबाद, अटलबिहारी वाजपेयी जिंदाबाद, अशा घोषणा झाल्यानंतर अटलजींनी तो जमाव शांत केला." आणीबाणीत जनसंघाने कशी परिस्थिती हाताळली याची आठवण सांगताना मुख्यमंत्री भावूक झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थिती होते.


Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी