उसळीतील कोंथिबीर वडी

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात कोथिंबीर वडी ही एक झणझणीत, कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची पारंपरिक डिश आहे. बहुतेक वेळा वड्या खाऊन उरतात आणि मग त्या कशा वापरायच्या, असा प्रश्न पडतो. अशावेळी आजी-आईंच्या स्वयंपाकघरातून आलेली एक सुंदर कल्पना म्हणजे – उरलेल्या कोथिंबीर वड्यांची झणझणीत उसळ! ‘उसळीतील कोंथिबीर वडी’ ही गावाकडची आणि विस्मरणात गेलेली मस्त झणझणीत रेसिपी आहे.


साहित्य


५-६ उरलेल्या कोथिंबीर वड्या (कापून)
१ मध्यम कांदा (बारीक चिरून)
२ टेबलस्पून ओले खोबरे (ऐच्छिक)
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला / गरम मसाला
१ टीस्पून गूळ
१ चमचा तेल
मीठ चवीनुसार
पाणी – १ कप
कोथिंबीर सजावटीसाठी


‍कृती 


कढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी तडतडली की आलं-लसूण पेस्ट टाका आणि ३० सेकंद परतवा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. हळद, तिखट, गोडा मसाला घालून नीट परतवा. १ कप पाणी आणि गूळ (ऐच्छिक आहे)घालून उकळी आणा. मीठ चवीनुसार टाका. उकळी आली की त्यात कापलेल्या कोथिंबीर वड्या घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटं शिजू द्या, जेणेकरून वड्या रस्सा पिऊन मऊ होतील. वरून कोथिंबीर व खोबरं घाला. झाकण ठेवून २ मिनिटं वाफ येऊ द्या.


टीप : ही उसळ थोडी पातळ ठेवली तर कोथिंबीर वड्या रस्सा छान वाटतो. हवे असल्यास थोडे भरड दाणे घालून चव अजून वाढवता येते.

Comments
Add Comment

गावाची थोरवी

फेरफटका-सीमा मालाणी माझा एक मित्र धार्मिक आहे. त्याने 'गो-सेवा' म्हणून एक गाय पाळली आहे. शिवाय गावठी गाईचे दूध

‘लॉर्ड्स’वरच्या लाडक्या लेकी!

सतीश स. कुलकर्णी क्रिकेटची पंढरी’ ही लॉर्ड्स मैदानाची ओळख. साहेबांच्या भाषेत ते आहे ‘Home of Cricket’. त्या घरच्या

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या