Tata Motors: टाटा मोटर्सने हॅरियर.इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची घोषणा केली

  52

मुंबई: टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील मोठ्या चारचाकी इव्ही (EV Car)उत्पादकाने आज भारतात बनलेल्या स्वदेशी दमदार एसयूव्ही हॅरियर.इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची घोषणा केली.केवळ या उद्योगातच नाही,तर जगभरात नवीन असलेली इनोव्हेशन्स आणि बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटीसह सुलभ मालकी प्रदान करण्या बाबतची हॅरियर.इव्हीने केवळ आपली विश्वासार्हता मजबूत केलेली नाही,तर सुपरकार सारखा परफॉर्मन्स,कुठेही घेऊन जाऊ शकणारी ऑफ-रोड क्षमता,आकर्षक टेक्नॉलॉजी आणि आलीशान आरामदायकता प्रदर्शित करून भविष्याची अल्टीमेट एसयूव्ही म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे असे कंपनीकडून लाँच दरम्यान म्हटले गेले आहे.


२ जुलैपासून हॅरियर.इव्हीचे बुकिंग सुरू होत आहे. रियर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी)द्वारा संचालित प्रकारासाठीच्या प्रारंभिक किंमती २१.४९ लाखांपासून सुरु होत आहेत.हॅरियर.इव्ही अँडव्हेंचर ६५ची किंमत २१.४९ लाख रुपये,अँडव्हेंचर एस ६५ ची किंमत २१.९९ लाख रुपये,फियरलेस+ ६५ ची किंमत २३.९९ लाख रुपये, फियरलेस+ ७५ ची किंमत २४.९९ लाख रुपये आणि एम्पॉवर्ड ७५ ची किंमत २७.४९ लाख असणार आहे असे कंपनीने म्हटले आहे.


हॅरियर.इव्हीच्या स्पर्धात्मक किंमती ठेवण्याच्या धोरणाविषयी टिप्पणी करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवास्तव म्हणाले,'हॅरियर.इव्ही सह एका सुपरकार प्रमाणे बेजोड परफॉर्मन्स देण्याची,कुठेही ऑफ रोड जाण्याची,आलिशान आरामदायकता देण्याची एका एसयूव्हीची खरी क्षमता उघड करण्याची आमची इच्छा आहे. हॅरियर.इव्हीमध्ये लक्षणीय असे काय आहे, तर हे वाहन या सर्वच गोष्टी प्रदान करते आणि तेही आयसीई संचालित वाहनांच्या किंमतीत आणि परफॉर्मन्स,कार्यक्षमता,टेक्नॉलॉजी आणि सुरक्षा याबाबतीत मात्र हॅरियर. इव्ही आयसीई (ICE) संचालित वाहनांना मागे टाकते.आज या वाहनाच्या किंमती जाहीर करताना आम्ही भारतात ई-मोबिलिटीला पुढे घेऊन जाण्याच्या दिशेने एक लक्षणीय पाऊल उचलत आहोत आणि त्याचबरोबर पारंपरिक आयसीई संचालित वाहनांना एक दमदार पर्याय देऊ करत आहोत.आम्हाला खात्री आहे की,हॅरियर.इव्ही एसयूव्ही या उद्योगात एसयूव्हीच्या नवीन युगाची सुरुवात करेल.या युगात वाहनाला शक्ती कुठून मिळते हे नाही,तर वाहन कशी शक्ती प्रदान करते हे महत्त्वाचे असेल.'


हॅरियर.इव्हीची ठळक वैशिष्ट्ये:


सुपरकारसारखा परफॉर्मन्स अनुभवा


पुढच्या बाजूस १५८ पीएस (११६ केडब्ल्यू)ची ड्युअल मोटर शक्ती आणि मागील बांजून २३८ पीएस (१७५ केडब्ल्यू)


ड्युअल मोटर सेटअपमधून ५०४ एनएम टॉर्क


६.३ सेकंदात ०-१०० किमी प्रति तास सेगमेन्ट श्रेणीत


या एसयूव्हीसह कुठेही ऑफ-रोड जाण्याची क्षमता


क्वॉड व्हील ड्राइव्ह सिस्टमसह अप्रतिम ऑफ-रोड अनुभव


सहा टेरेन मोड असल्यावर काहीच अशक्य नाही यामुळे कुठेही बिनधास्त जाण्याचा विश्वास मिळतो असे कंपनीने म्हणणे आहे.


५४० अंश सराऊंड व्ह्यू सह आसपासचे आणि खालचे देखील बघू शकता


सेव्हर इंडल्जंट टेक्नॉलॉजी आणि पूर्वी कधीही नव्हती इतकी आरामदायकता


असामान्य हाताळणी आणि चालवण्याच्या कम्फर्टसाठी फ्रिक्वन्सी डिपेन्डन्ट डॅम्पिंगसह अल्ट्रा गाइड सस्पेंशनसह बेजोड आरामदायकता आणि शांती मिळवा


जगातील पहिली हरमनची ३६.९ सेमी (१४.५३”) सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट स्क्रीन, जी सॅमसंग निओ क्यूएलईडीद्वारा संचालित आहे. हा जगातील पहिला निओ क्यूएलईडी ऑटोमोटिव्ह डिस्प्ले आहे,यात JBL ऑडिओ मोड आणि डॉल्बी अटमॉस सह जेबीएल ब्लॅक १० स्पीकर सिस्टम आहे,जी थिएटरमॅक्स अनुभव देते


ई-व्हॅले ऑटो पार्क असिस्ट, डिजी अक्सेस डिजिटल की आणि ड्राइव्हपे सह तुमच्या हातात सुविधेचे बळ


मालकीच्या मुक्त अनुभवासाठी बॅटरी पॅकवर आजीवन वॉरंटी दिली आहे (*फक्त प्रथम मालक – खाजगी वैयक्तिक ग्राहकासाठीच)


७५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकचे पाठबळ जे ६२७ किमीची एआरएआय प्रमाणित (पी१ + पी२) रेंज (अंदाजे ४८० किमी – ५०५ किमी सी७५ रेंज)देते


१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमी पर्यंत रेंज जोडून जलद चार्जिंग स्पीडचा लाभ मिळवा


हॅरियर.इव्ही केवळ आपल्या अत्याधुनिक क्षमता प्रदर्शित करत नाही, तर देशात बनणाऱ्या एसयूव्हीसाठी एक नवीन मापदंड (Benchmark) स्थापित करते असे कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ